Upcoming Smartphones: लेटेस्ट Samsung Galaxy M16 आणि M06 5G चे भारतीय लाँच कन्फर्म!
Samsung आता Samsung Galaxy A आणि F सिरीजच्या लोकप्रियेतनंतर सॅमसंग गॅलेक्सी M सिरीज आणण्यासाठी सज्ज
या सिरीजअंतर्गत फोन Samsung Galaxy M16 आणि Samsung Galaxy M06 5G असतील.
आगामी स्मार्टफोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाईव्ह
प्रसिद्ध साऊथ कोरियाची टेक दिग्गक Samsung आता Samsung Galaxy A आणि F सिरीजच्या लोकप्रियेतनंतर सॅमसंग गॅलेक्सी M सिरीज आणण्यासाठी सज्ज झाली आहे. या नव्या सिरीज अंतर्गत नवीन फोन भारतात लाँच होणार आहेत. होय, कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोनच्या लाँचची पुष्टी केली आहे. हे दोन फोन Samsung Galaxy M16 आणि Samsung Galaxy M06 5G असतील. लक्षात घ्या की, दोन्ही फोनसाठी डेडिकेटेड टीझर पोस्टर Amazon वर लाईव्ह झाले आहे, जे या फोनच्या लाँचची पुष्टी करतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy M16 आणि M06 5G चे भारतीय लॉन्चिंग तपशील-
SurveySamsung Galaxy M16 आणि M06 5G चे भारतीय लाँच
आगामी Samsung Galaxy M16 आणि Samsung Galaxy M06 5G स्मार्टफोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाईव्ह झाली आहे. ही साइट लाईव्ह झाल्यामुळे, हे फोन लवकरच भारतात लाँच केले जातील, अशी शक्यता आहे. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप फोनची लाँचिंग तारीख जाहीर केलेली नाही. फोनच्या नावासोबतच M सीरीजच्या या दोन नवीन स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनलची झलक पोस्टरमध्ये दिसून आली आहे.
Prepare to witness the true Monster power that can't be beaten.
— Samsung India (@SamsungIndia) February 23, 2025
Stay tuned to know more. #CantBeatTheMonster #GalaxyM06 5G #GalaxyM16 5G #Samsung pic.twitter.com/Vtwo0MXMIE
पोस्टरनुसार, M16 आणि M06 फोनच्या मागील बाजूस कॅप्सूलच्या आकाराचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. फोनच्या मॉड्यूलमध्ये दोन सेन्सर एका रिंगमध्ये दिसत आहेत, तर दुसरे रिंग बॉटमला दिसत आहे. तर, दुसऱ्या फोनमध्ये फक्त दोन कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. कॅमेरा मॉड्यूलच्या बाहेर LED फ्लॅश दिसत आहे. तर, अमेझॉन लिस्टिंगवरून हे स्मार्टफोन निश्चितंच Amazon द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतील.
Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन

Samsung ने Samsung Galaxy F06 5G फोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या फोनची विक्री नुकतेच भारतात सुरू झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज झाल्यास दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile