iQOO Neo 10R 5G: कंपनीच्या आगामी स्मार्टफोन लाँचची घोषणा! किंमत, लाँच टाइम, स्पेसिफिकेशन्स लीक 

HIGHLIGHTS

iQOO ने काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये iQOO Neo 10 सिरीज सादर केली होती.

कंपनी या लाइनअपमध्ये नवीन मॉडेल iQOO Neo 10R 5G जोडण्याचा विचार करत आहे.

भारतीय बाजारपेठेत या हँडसेटची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

iQOO Neo 10R 5G: कंपनीच्या आगामी स्मार्टफोन लाँचची घोषणा! किंमत, लाँच टाइम, स्पेसिफिकेशन्स लीक 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये iQOO Neo 10 सिरीज सादर केली होती. या सिरीजअंतर्गत iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले होते. दरम्यान, पुढे आलेल्या वृत्तानुसार, कंपनी या लाइनअपमध्ये नवीन मॉडेल iQOO Neo 10R 5G जोडण्याचा विचार करत आहे, जो भारतीय बाजारात लाँच केला जाईल. आगामी स्मार्टफोनचे लॉन्चिंगशी संबंधित तपशील, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. जाणून घेऊयात iQOO Neo 10R 5G बद्दल सविस्तर तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Samsung Galaxy Unpacked 2025: इव्हेंटदरम्यान Samsung Galaxy S25 सिरीजसह ‘ही’ उपकरणे होतील लाँच, पहा डिटेल्स

iQOO Neo 10R 5G लाँच टाइमलाईन लीक

मिळालेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय टिपस्टर पारस गुगलानी यांच्या मते, आगामी iQOO Neo 10R 5G स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच केला जाईल. भारतीय बाजारपेठेत या हँडसेटची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे सांगितले गेले आहे. हा स्मार्टफोन Xiaomi, OPPO, POCO, Realme आणि Samsung सारख्या ब्रँडच्या उपकरणांशी स्पर्धा करणार आहे. हा फोन ब्लू व्हाईट स्लाइस आणि लुनर टायटॅनियम कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.

iQOO Neo 10R 5G
iQOO Neo 10R 5G

iQOO Neo 10R 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक

iQOO च्या आगामी स्मार्टफोन iQOO Neo 10R 5G मध्ये 6.78 इंच लांबीका AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz असेल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. हा हँडसेट Android 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी, कंपनी iQOO Neo 10R फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT-600 लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा दिला जाईल. 50MP मेन कॅमेरा असल्यामुळे तुम्ही आकर्षक पिक्चर कॉलिटी, कॉन्ट्रास्ट कलर आणि उत्कृष्ट लो लाईट परफॉर्मन्सची अपेक्षा करू शकता.

जर तुम्ही व्यावसायिक फोटोग्राफर असाल किंवा फक्त फोटो काढायला आवडत असेल, तर 50MP मेन कॅमेरा फोन अपवादात्मक क्लॅरिटीसह तुम्हाला उत्कृष्ट फोटोज देईल. तसेच, 16MP रिझोल्यूशनवर, कॅमेरे उत्कृष्ट परिणामकारक इमेज कॉलिटी प्रदान करतात, ज्यामध्ये भरपूर रिझोल्यूशन डिटेल असते. जर तुम्ही सेल्फीचे शौकिंग असाल तर, 16MP फ्रंट कॅमेरा तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo