आत्ताच बजेट प्लॅन करा! भारतात लाँचपूर्वीच आगामी iQOO 13 ची किंमत Leak, मिळतील Powerful फीचर्स
iQOO चा आगामी iQOO 13 स्मार्टफोन भारतात पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच होणार
आगामी iQOO 13 ची लीक किंमत ताज्या अहवालात समोर आली आहे.
हा फोन नवीनतम Realme GT 7 Pro, आगामी OnePlus 13 आणि Vivo X200 ला जबरदस्त स्पर्धा देणार
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO आपला आगामी iQOO 13 स्मार्टफोन भारतात पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच करणार आहे. मात्र, फोनच्या अधिकृत लाँचपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे अनेक तपशील लीक करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन येत्या 3 डिसेंबर 2024 ला भारतात लाँच होणार आहे. दरम्यान, आगामी स्मार्टफोनची लीक किंमत ताज्या अहवालात समोर आली आहे. हा स्मार्टफोन नवीनतम Realme GT 7 Pro आणि आगामी OnePlus 13 आणि Vivo X200 ला जबरदस्त स्पर्धा देणार आहे, अशा चर्चा टेक विश्वात सुरु आहेत. जाणून घेऊयात iQOO 13 ची लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
SurveyAlso Read: Samsung Galaxy S24 Ultra 5G वर तब्बल 12000 रुपयांचा Discount, अशी डील पुन्हा मिळणे नाही
iQOO 13 ची लीक भारतीय किंमत
लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माचा दावा आहे की, iQOO 13 स्मार्टफोनची प्री-ऑफर किंमत भारतात 55,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच स्मार्टफोनची किंमत 55000 रुपये किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
[Exclusive] iQOO 13 base variant 12+256GB pre-offer price will be under ₹55k in the country.#iQOO13
— Mukul Sharma (@stufflistings) November 29, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येईल, असा दावा टीपस्टरने केला आहे. मात्र, फोनची खरी किंमत फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, iQOO 12 फोन 52,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता आणि iQOO 13 हा जुन्या मॉडेलचा सक्सेसर असणार आहे.
iQOO 13 चे अपेक्षित तपशील
लेटेस्ट iQOO 13 फोन चीनमध्ये आधीच लाँच झाला आहे. या फोनचे भारतीय स्पेसिफिकेशन्स देखील जवळपास समान असू शकतात. आगामी iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा 2K BOE Q10 8T LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात Qualcomm चा नवीनतम Snapdragon 8 Elite प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Q2 गेमिंग चिपसेटसह येतो. तसेच, फोन Android 15 वर आधारित OriginOS 5 वर कार्य करेल.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी iQOO 13 च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह 50MP मुख्य कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6150mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W वायर्ड चार्जिंगसह येईल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनची खरी किंमत आणि योग्य तपशील हा फोन लाँच झाल्यावरहा पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile