Apple च्या नवीन कार्यक्रमाची तारीख जाहीर! स्वस्त iPhone SE 4 लवकरच होणार लाँच, पहा डिटेल्स 

HIGHLIGHTS

Apple ने त्यांच्या आगामी कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे.

Apple इव्हेंटमध्ये नेक्स्ट जनरेशनचा SE सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.

पोस्टनुसार, कंपनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

Apple च्या नवीन कार्यक्रमाची तारीख जाहीर! स्वस्त iPhone SE 4 लवकरच होणार लाँच, पहा डिटेल्स 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Apple ने त्यांच्या आगामी कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे. कंपनी पुढील आठवड्यात एक इव्हेंट आयोजित करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही काळापासून Apple iPhone SE 4 च्या लाँचिंगबद्दल अनेक बातम्या पुढे येत आहेत. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत लाँच तारीख जाहीर केलेली नाही. या Apple इव्हेंटमध्ये नेक्स्ट जनरेशनचा SE सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iPhone SE 4 चे लॉन्चिंग डिटेल्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon वर स्वस्त झाले महागडे स्मार्टफोन्स, OnePlus, Samsung फोनवर Best ऑफर्स

Apple Event

Apple चे CEO टिम कुक यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच (ट्विटर) अकाउंटवरून ट्विट करून आगामी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. “कुटुंबातील नवीन सदस्याला भेटण्यासाठी सज्ज व्हा.”, असे टीम कूक यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. पोस्टनुसार, कंपनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यामध्ये एक नवीन सदस्य म्हणजेच कंपनीचे प्रोडक्ट लाँच केले जाईल. पोस्टमध्ये कंपनीचा लोगो दाखवणारा एक छोटासा टीझर देखील आहे.”

सध्या सीईओंनी या कार्यक्रमात काय लाँच केले जाईल याची पुष्टी केलेली नाही. तथापि, अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रम iPhone SE 4 चा लाँच कार्यक्रम असू शकतो. प्रसिद्ध प्रकाशकांच्या मते, iPhone SE 4 च्या घोषणेसाठी देखील हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

iPhone SE 4 चे अपेक्षित तपशील

iphone se 4 launch update affordable smartphone

लीकनुसार, Apple च्या या आगामी स्मार्टफोनबद्दल बरेच काही उघड झाले आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, फोनची डिझाईन मोठ्या प्रमाणात iPhone 14 सारखीच असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमध्ये फेस आयडी देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट असण्याची अपेक्षा आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 48MP कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. कंपनी लवकरच तिच्या आगामी कार्यक्रमात कोणते उत्पादन लाँच करणार आहे, याची पुष्टी करेल अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo