2जीबी रॅम असलेला कार्बन टायटेनियम मॅक ५ लाँच केवळ ५,९९९ रुपयांत

2जीबी रॅम असलेला कार्बन टायटेनियम मॅक ५ लाँच केवळ ५,९९९ रुपयांत
HIGHLIGHTS

५ इंचाच्या स्क्रिन सोबत अॅनड्रॉईड लॉलीपॉपचा हयात समावेश करण्यात आला आहे.

कार्बनने लाँच केला नवीन स्मार्टफोन ज्याचे नाव आहे टायटेनियम मॅक ५. हया फोनची किंमत ५,९९९ रुपये इतकी असून हयात अॅनड्रॉईड लॉलीपॉपचाही समावेश करण्यात आलाय. सध्याच्या इतर OS पेक्षा हा स्मार्टफोन १.३ GHz क्वाड-कोअर प्रोसेसर आणि २जीबी रॅमसह देण्यात आला आहे.

 

हया कार्बन टायटेनियम मॅक ५ ला LED फ्लॅश असलेला ८मेगापिक्सेल रियर शुटर कॅमेरा आणि सेल्फीप्रेमींसाठी BSI सेन्सर फलॅश असलेला ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हया फोनला १६ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. आणि जी ३२ जीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरी कार्डद्वारा वाढवता येऊ शकते. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, कार्बन टायटेनियम मॅक ५ ला ५ इंचाचा एचडी डिस्प्ले असून १२८०x७२० रिझोल्युशन आणि कपॅसिटीव्ह टच आहे. हया फोनमध्ये २२०० mAh बॅटरी आहे. हयाची जाडी ८.७mm ची असून त्याचे वजन जवळपास १५९ ग्रॅम्स आहे.

 

कार्बनच्या हया नवीनतम डिव्हाईसमध्ये आधीपासूनच पील स्मार्ट रिमोट अॅप आणि स्विफ्टकी कीपॅडचा समावेश करण्यात आला आहे. हा फोन केवळ अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध करण्यात आला आहे. ह्या फोनच्या लाँचमध्ये अधिक भर म्हणजे ह्या फोनच्या स्थापनेपासून म्हणजे अगदी २००९ पासून आतापर्यंत कार्बनने ११० स्मार्टफोन्स आणि २४५ फिचर फोन्स लाँच केल्याची घोषणा कार्बनने केलीय. तसेच पुढील ३ वर्षात भारतात मोबाईल उत्पादनासाठी ८०० करोड गुंतवण्याची कार्बनची योजना आहे.  

हया फोन आधी कार्बनने कार्बन टायटेनियम मॅक वन आणि मॅक टू असे २ फोन लाँच केले आहेत. कार्बन मॅक बन ४.७’’ ७२०p IPS डिस्प्ले, १.३ GHz क्वाड-कोर प्रोसेसर, १जीबी रॅम आणि ८MP/५MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मॅक टू ला ५’’HD डिस्प्लेसोबत गोरिला ग्लास ३ने संरक्षित करण्यात आले असून, १.२ GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर, १जीबी रॅम आणि ८MP फ्रंट आणि रियर शुटर देण्यात आला आहे. हे दोन्ही फोन्स अॅनड्रॉईड किटकॅट ४.४ ने कार्यरत आहेत.  

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo