Tecno Spark Go 2024 फोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म, मिळेल iPhone सारखे Special फीचर। Tech News
Tecno Spark Go 2024 स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी
Tecno Spark Go 2024 भारतात 4 डिसेंबरला लाँच केला जाईल.
फोनमध्ये Apple च्या iPhones सारखे Dynamic Island हे फीचर दिले जाईल.
Tecno Spark Go 2024 स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी झाली आहे. अलीकडेच कंपनीने या फोनचे इंडिया लाँच टीज केले होते. याशिवाय, हा फोन Amazon India वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन तपशील देखील Amazon लिस्टिंग द्वारे समोर आले आहेत. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर टेक्नोचा हा फोन Apple च्या iPhones सारख्या डायनॅमिक आयलंड फीचरसह येईल, असे आधीच सांगण्यात आले आहे.
SurveyTecno Spark Go 2024 भारतीय लाँच
कंपनीने Tecno Spark Go 2024 स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. हा फोन भारतात 4 डिसेंबरला लाँच केला जाईल. हा फोन आधीच Amazon India वर सूचिबद्ध झाला आहे, त्यामुळे या फोनची सेल देखील Amazon India वर उपलब्ध असेल.
Spark is mighty, Spark is powerful 🚀
— TECNO Mobile India (@TecnoMobileInd) November 30, 2023
It's the Spark of speed ⚡
Introducing TECNO #SparkGo2024, with a 90Hz Dot-in Display, T606 Octa-core processor, and memory up to 8 GB* + 128 GB.
Stay tuned!
Get notified: https://t.co/zMEdxgLWGN#TECNOSmartphones #BharatKaApnaSpark pic.twitter.com/eJSfNNzEi2
Tecno Spark Go 2024 ची किंमत
या लिस्टिंगद्वारे, फोनच्या फीचर्स आणि किंमतीशी संबंधित तपशील देखील पुढे आला आहे. लिस्टिंगबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी असेल. लक्षात घ्या की, भारतापूर्वी हा फोन मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे, त्याठिकाणी हा फोन RM 399 म्हणजेच जवळपास 7,200 रुपयांच्या किमतीत सादर केला गेला.
Tecno Spark Go 2024 चे तपशील

आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon लिस्टिंगनुसार हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येईल. याशिवाय, फोन Unisoc T606 प्रोसेसरने देखील सुसज्ज आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज उपलब्ध असेल. या फोनच्या स्पेशल फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये Apple च्या iPhones सारखे Dynamic Island हे फीचर दिले जाईल. डिस्प्लेमध्ये एक पंच-होल कटआउट देखील असेल, ज्यामध्ये नोटिफिकेशन्स देखील दिसतील.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एक 13MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची बॅटरी 5000mAh असेल आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट दिला जाऊ शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile