HIGHLIGHTS
Tecno Spark 10 4G एंट्री लेवल सेगमेंटमध्ये लाँच
फोनची किंमत 90 डॉलर म्हणजेच सुमारे 7 हजार 400 रुपये
तुम्हाला 8 GB रॅम सह 128 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल.
Tecno कडे बजेट किमतीत येणारे बरेच स्मार्टफोन्स आहेत. हे स्मार्टफोन स्टयलिश लुक आणि उत्तम फीचर्ससह येतात. या यादीत आता आणखी एक नाव जुळले आहे. Tecno Spark 10 4G फोन प्रत्येक ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. जास्त वेळ न घालवता या फोनचे फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि मुख्य म्हणजे या फोनची किंमत जाणून घेऊयात.
Surveyया लेटेस्ट बजेट फोनची किंमत 90 डॉलर म्हणजेच सुमारे 7 हजार 400 रुपये आहे. हा स्मार्टफोन मेटा ब्लॅक, मेटा व्हाईट आणि मेटा ब्लू या तीन कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
टेक्नो मोबाईल फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले HD प्लस रिझोल्यूशन आणि 90 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. तुम्हाला फ्रंटमध्ये वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच मिळणार आहे. यात IMG PowerVR GPU सह MediaTek Helio G37 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, तुम्हाला 8 GB रॅम सह 128 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल.
फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W चार्जिंग समर्थनासह येणार आहे. यात USB टाईप C चार्जर मिळेल. फोनच्या मागील पॅनलवर दोन कॅमेरे आहेत, AI लेन्स आणि LED फ्लॅश 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह मिळतील. ड्युअल LED फ्लॅशसह सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, जो पॉवर बटनमध्ये इंटिग्रेट करण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile