भारतातील सर्वात स्लिम Tecno स्मार्टफोन 29 मार्च रोजी होणार लाँच, नव्या फोनमध्ये मिळतील Powerful फीचर्स। Tech News 

HIGHLIGHTS

Tecno Pova 6 Pro 5G च्या भारतीय लाँचची तारीख निश्चित

आगामी फोन शुक्रवारी 29 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल.

हा स्मार्टफोन 20,000 रुपयांच्या आत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

भारतातील सर्वात स्लिम Tecno स्मार्टफोन 29 मार्च रोजी होणार लाँच, नव्या फोनमध्ये मिळतील Powerful फीचर्स। Tech News 

Tecno Pova 6 Pro 5G च्या भारतीय लाँचची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा फोन येत्या दोन दिवसांत भारतात जबरदस्त एन्ट्री घेणार आहे. हा गेमिंग स्मार्टफोन गेल्या महिन्यात बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा हँडसेट Tecno POVA 5 Pro चा सक्सेसर म्हणून बाजारात लाँच केला जाईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Upcoming Foldable Smartphone: Vivo चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन। Tech News

Tecno-Pova-6-Pro
Tecno-Pova-6-Pro

Tecno Pova 6 Pro 5G चे भारतीय लाँच

Tecno चा हा आगामी फोन शुक्रवारी 29 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. फोनचा लॉन्च इव्हेंट Amazon miniTV वर लाइव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. त्याबरोबरच, या उपकरणाची समर्पित मायक्रोसाइट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. ज्याद्वारे त्याबद्दलची जवळपास सर्व माहिती उघड झाली आहे. या 5G हँडसेटची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन 20,000 रुपयांच्या आत विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. हा स्मार्टफोन Comet Green आणि Meteorite Grey या दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल.

Tecno Pova 6 Pro 5G चे अपेक्षित तपशील

हा भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन असेल ज्यामध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. हे MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह येईल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 24GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी डिव्हाइसला IP53 देखील रेट केले जाईल.

Tecno-Pova-6-Pro-Design
Tecno-Pova-6-Pro-Design

फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 3x इन-सेन्सर झूमसह 108MP रिअर कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि सेल्फी/व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असेल. शेवटी, पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी डिव्हाइसला IP53 देखील रेट केले जाईल. आगामी Tecno फोन 6000mAh बॅटरी आणि 70W फास्ट चार्जरने सुसज्ज असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. केवळ 19 मिनिटांत 50% आणि 50 मिनिटांत 100% चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय उत्कृष्ट ध्वनी गुणवत्तेसह ड्युअल स्पीकरचा समावेश असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo