Tecno Camon 20 सिरीज भारतात 28 मे रोजी लाँच करण्यात आली. सिरीजअंतर्गत, कंपनीने Tecno Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G हे तीन स्मार्टफोन लाँच केले. कंपनीने सांगितले होते की, प्रो आणि प्रीमियम मॉडेलची सेल जूनमध्ये सुरु होईल. दरम्यान, Tecno Mobile India ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून प्रो मॉडेलची सेल डेट जाहीर झाली आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंट 8GB रॅमसह 128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये आहे.
— TECNO Mobile India (@TecnoMobileInd) June 13, 2023
Tecno Camon 20 Pro 5G सेलची तारीख जाहीर केली आहे. फोनची विक्री आजपासून म्हणजेच 15 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरू होईल. त्याआधी वापरकर्ते ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून प्री-बुक करू शकतात. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना वायरलेस इयरबड्स मिळत आहेत. फोन डार्क वेल्किन आणि सेरेनिटी ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
Tecno Camon 20 Pro 5G
Camon 20 Pro 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. हँडसेट डायमेंसिटी 8050 चिपसेटसह येतो. फोन Android 13 वर चालतो. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
त्याबरोबरच, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 64MP मेन कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास, यात 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile