Realme 11 Pro Series लाँचपूर्वी सुपरस्टार ‘शाहरुख खान’ कंपनीचे नवे ब्रँड अँबेसेडर, काय मिळेल विशेष?

Realme 11 Pro Series लाँचपूर्वी सुपरस्टार ‘शाहरुख खान’ कंपनीचे नवे ब्रँड अँबेसेडर, काय मिळेल विशेष?
HIGHLIGHTS

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान Realme चा नवीन ब्रँड अँबेसेडर

पुढील महिन्यात ब्रँड आपली Realme 11 Pro 5G सिरीज लाँच होणार

यात अपग्रेड केलेला ISOCELL HP3 SuperZoom 200MP सेन्सर कॅमेरा असेल.

Realme  पुढील महिन्यात ब्रँड आपली Realme 11 Pro 5G सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी स्मार्टफोन कंपनी Realme सोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीने गुरुवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, शाहरुख खान कंपनीचा नवीन ब्रँड अँबेसेडर बनला आहे. शाहरुख Realme च्या 'डेअर टू लीप' या ब्रीदवाक्याचा एक भाग बनला आहे. आगामी लाँचपूर्वी ही जबाबदारी शाहरुख खानवर सोपवण्यात आली आहे. 

ट्विटद्वारे कंपनीने दिली माहिती 

 

 

Realmeने ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "रील ते रियल पर्यंत, शाहरुख खान आमचा डेअर टू लीप पायनियर म्हणून पुढची झेप घेण्यास सज्ज आहे. फोटोखाली ''हॅलो न्यू ब्रँड अँबेसेडर" असे लिहिलेले दिसत आहे. पुढे ''नवीन Realme 11 Pro 5G सिरीजसाठी जूनमध्ये भेटू'', असे बारीक अक्षरात लिहलेले दिसतेय.  

 

 

आगामी सिरीजमध्ये काय मिळेल विशेष ? 

कंपनीच्या वेबसाइटनुसार विशेषतः या नवीन सीरिजमध्ये जो कॅमेरा असेल, तो जास्तीत जास्त पिक्सेल 200MP पॉवरसह येईल. यात अपग्रेड केलेला ISOCELL HP3 SuperZoom 200MP सेन्सर कॅमेरा असेल. यासह जबरदस्त कॅमेरासह तुम्हाला फोटोग्राफीचा भारी अनुभव मिळणार आहे. 24 मे रोजी कंपनीने नवीन सीरीज फोनच्या स्मार्टफोनचा टीझर देखील जारी केला.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo