Asus Zenfone Max Pro M1 विरुद्ध Zenfone Max Pro M2; जास्त चांगला कोण?

Updated on 14-Dec-2018
HIGHLIGHTS

Asus ने भारतात आपला नवीन बजेट मोबाईल फोन Asus Zenfone Max Pro M2 लॉन्च केला आहे, या मोबाईल फोन ची किंमत Rs 12,999 पासून सुरु होत आहे. आज आम्ही या मोबाईल फोनची याच मोबाईल फोनच्या पिढीतील जुन्या मोबाईल फोन म्हणजे Asus Zenfone Max Pro M1 सोबत करणार आहोत.

Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन रशियात लॉन्च केल्यानंतर आता हा भारतात लॉन्च केला गेला आहे. हा मोबाईल फोन वेगवगेळ्या तीन वेरीएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा तुम्ही 3GB/32GB, 4GB/64GB, आणि 6GB/64GB वेरीएंट्स मध्ये विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे हा कंपनी ने लॉन्च केलेला एकमात्र असा पहिला मोबाईल फोन आहे, जो गोरिला ग्लास 6 च्या प्रोटेक्शन सह लॉन्च केला गेला आहे. Max Pro M2 गेल्या वर्षी असुस ने लॉन्च केलेल्या स्नॅपड्रॅगॉन 636 वर चालणाऱ्या मोबाईल फोन Max Pro M1 च्या पिढीचा नवीन मोबाईल फोन आहे. आज आम्ही या दोन्ही मोबाईल फोन्सची एकमेकांशी तुलना करणार आहे. 

डिस्प्ले

Asus Zenfone Max Pro M2  स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा FHD+ नॉच डिस्प्ले मिळत आहे. हि एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन आहे. तसेच हा Asus चा पाहिलं असा मोबाईल फोन आहे जो बजेट किंमतीत लॉन्च केला गेला आहे. सोबतच यात तुम्हाला गोरिला ग्लास 6 ची सुरक्षा पण मिळत आहे. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट पण मिळत आहे.

तसेच जर Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल फोन एका 5.99-इंचाच्या IPS LCD डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोनची स्क्रीन 1080×2160 पिक्सल आहे. या मोबाईल फोनच्या स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला नॉच मिळणार नाही. जरी इतर अनेक लेटेस्ट मोबाईल फोन्स मध्ये हा फीचर असाल तरी. 

प्रोसेसर

Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे. यह मोबाईल फोन तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट्स मध्ये येतो. हा मोबाईल फोन 3GB/32GB, 4GB/64GB आणि 6GB/64GB स्टोरेज वेरीएंट मध्ये विकत घेता येईल. तसेच यात तुम्हाला तीन स्लॉट पण मिळत आहेत, जे तुम्ही दोन सिम आणि एका माइक्रोएसडी कार्डसाठी वापरू शकता. तसेच जर तुम्ही स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर तुम्ही ती 2TB पर्यंत वाढवू शकता. 

आता Max Pro M1 मोबाईल फोन बद्दल बोलूया यात तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळत आहे आणि हा मोबाईल फोन 3GB, 4GB, आणि 6GB रॅम ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. तसेच याची स्टोरेज पण तुम्ही Asus Zenfone Max Pro M2 प्रमाणे 2TB पर्यंत वाढवू शकता. 

कॅमेरा

Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे, या कॅमेऱ्यातून तुम्ही 4K विडियो रेकॉर्ड करू शकता. तसेच यात तुम्हाला Pro मोड पण मिळत आहे. असे पण समोर येत आहे की येत्या काही महिन्यांत या फोनला FOTA अपडेट मिळणार आहे, त्यानंतर या मोबाईल फोनला AI सीन डिटेक्शन मिळेल. याच्या फ्रंट पॅनल वर तुम्हाला एक 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फ्रंट फ्लॅश पण मिळत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही पोर्ट्रेट फोटो पण घेऊ शकता.

Asus Zenfone Max Pro M1 पाहता यात पण एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, हा कॅमेरा 13MP+5MP चा एक रियर कॅमेरा सेटअप आणि एक 8MP चा फ्रंट कॅमेरा पण फोन मध्ये सेल्फी इतयादी साठी आहे. 

किंमत

Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर याची किंमत Rs 12,999 पासून सुरु होत आहे, हि किंमत या मोबाईल फोनच्या 3GB/32GB स्टोरेज ऑप्शनची आहे. तसेच या मोबाईल फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 14,999 आणि 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs 16,999 मध्ये विकत घेत येईल. फोन Flipkart वरून 18 डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहे. 

तसेच जर Asus Zenfone Max Pro M1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा Flipakrt च्या माध्यमातून Rs 10,999 मध्ये विकत घेता येईल.
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :