लवकरच इन्स्टाग्राम वर 1 तासापर्यंतचा विडियो करता येईल अपलोड

Updated on 07-Jun-2018
HIGHLIGHTS

सध्या इन्स्टाग्राम वर मेन फीड वर 60 सेकंड्स पर्यंतचा विडियो अपलोड केला जाऊ शकतो, तर इन्स्टाग्राम स्टोरीज मध्ये 15 सेकंड्स च्या आसपास विडियो क्लिप अपलोड करता येते.

फेसबुक च्या मालिकेचा इन्स्टाग्राम लवकरच आपल्या प्लॅटफार्म वर अपलोड केल्या जाणार्‍या वीडियो वरील वेळेची मर्यादा बदलू शकते, ज्यामुळे यूजर्स एक तासापर्यंतचा विडियो अपलोड करु शकतील. WSJ च्या रिपोर्ट नुसार इन्स्टाग्राम आपला यूजर एक्सपीरियंस चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा फीचर याला YouTube च्या स्पर्धेत घेऊन येऊ शकतो तसेच हा फेसबुक च्या विडियो शेयरिंग प्लॅटफॉर्मला पण टक्कर देऊ शकतो. 

सध्या इन्स्टाग्राम वर मेन फीड वर 60 सेकंड्स पर्यंतचा विडियो अपलोड केला जाऊ शकतो, तर इन्स्टाग्राम स्टोरीज मध्ये 15 सेकंड्स च्या आसपास विडियो क्लिप अपलोड करता येते. तसे पाहता विडियो ची लांबी ही प्लॅटफॉर्म च्या वापरा नुसार असावी त्यानुसार लांब विडियो प्ले झाल्यामुळे हे प्लॅटफॉर्म साठी फायदेशीर ठरू शकते. 

पण हेही सुरवातीच्या टेस्टिंग स्टेज मध्ये आहे. इन्स्टाग्राम सध्या स्मार्टफोन-स्पेसिफिक प्लॅटफार्म आहे जिथे यूजर्स छोटे, क्रिस्प इमेज आणि विडियो बघने पसंत करतात. 

इन्स्टाग्राम चे 800 मिलियन यूजर्स आहेत ज्यात स्टोरीज फीचर वर 300 मिलियन अॅक्टिव डेली यूजर्स आहेत. स्टोरीज वर एका ठराविक वेळेपर्यंत पोस्ट राहते जी एक दिवसानंतर एक्सपायर होते. लॉन्ग-फॉर्म विडियो स्टोरीज सेक्शन मध्ये फिट होऊ शकतात, कारण इन्स्टाग्राम जास्त फीचर-फिल्ड विडियो शेयरिंग प्लॅटफार्म बनताना दिसत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :