वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध

वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

वनप्लस 3 स्मार्टफोन सध्यातरी ग्रेफाइट रंगात उपलब्ध आहे.

वनप्लसने अलीकडेच बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच केला. भारतात ह्या फोनला २७,९९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केले गेले आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनी आपल्या ह्या फोनला कोणत्याही निमंत्रणाशिवा विकत आहे. वनप्लस 3 स्मार्टफोन सध्यातरी ग्रेफाइट रंगात उपलब्ध आहे. तथापि वनप्लस 3 स्मार्टफोनला सॉफ्ट गोल्ड व्हर्जनमध्ये लाँच केले गेले आहे. हा सध्या विक्रीसाठी उपलब्ध नाही. तथापि, वनप्लस 3 चे सह संस्थापक Carl Pei ने ट्विटरवर ह्याविषयी माहिती दिली आहे. मात्र हे अजून निश्चित झालेले नाही, की कंपनी ह्या सॉफ्ट गोल्ड व्हर्जनला भारतात केव्हा लाँच करेल.

वनप्लस 3 स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुरक्षित आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो.

 

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात NFC सपोर्ट, USB टाइप-C, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh  बॅटरीने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
हेदेखील वाचा – 
हार्ले डेविडसन बनवत आहे एक इलेक्ट्रिक बाइक!

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo