Samsung Galaxy Unpacked 2022: नवीन फोल्डेबल फोन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy Unpacked 2022: नवीन फोल्डेबल फोन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 भारतात लाँच

Samsung ने Galaxy Watch 5 सिरीज देखील लाँच केली

फोन्सची सुरुवातीची किंमत सुमारे 79,000 रुपये

Samsungने त्याच्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये दोन स्मार्टवॉच आणि एक इअरबडसह दोन फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. Samsung ने Galaxy Watch 5 सिरीज आणि Galaxy Buds 2 Pro व्यतिरिक्त Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 जागतिक बाजारपेठेत तसेच भारतात सादर केले आहेत. गॅलेक्सी वॉच 5 सीरिज अंतर्गत दोन स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यात गॅलेक्सी वॉच 5 आणि गॅलेक्सी वॉच 5 प्रो यांचा समावेश आहे. 

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा आकर्षक इव्हेंट आज, बघा काय होणार लाँच…

त्याबरोबरच, Galaxy Buds 2 Pro 360 डिग्री ऑडिओसह लाँच करण्यात आला आहे. याशिवाय, या बड्समध्ये डॉल्बी ऍटमॉसचाही सपोर्ट आहे. Galaxy Buds 2 pro चे आणखी एक फिचर म्हणजे तुम्ही ते स्मार्ट टीव्ही, टॅब आणि फोन या तिन्हींमध्ये एकाच वेळी वापरण्यास सक्षम असाल. यासाठी Galaxy Buds 2 pro मध्ये ऑटो स्विच फीचर देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही TV वर बड्स सोबत चित्रपट पाहतानाही फोनवरील कॉल्स रिसिव्ह करू  शकता.

samsung galaxy z flip 4

Samsung Galaxy Z Fold 4 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 7.6-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X Infinity Flex प्रायमरी डिस्प्ले आहे. दुसरा डिस्प्ले 6.2-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी ओ कव्हर डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1300 nits आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरी लेन्स 10 मेगापिक्सेल आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील उपलब्ध असेल. समोर दोन कॅमेरे आहेत, त्यापैकी एक 10 मेगापिक्सेलचा आणि दुसरा 4 मेगापिक्सेलचा आहे. 

त्याबरोबच, फोनसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + चे प्रोटेक्शन आहे. कॅमेरासह 30x स्पेस झूम देखील उपलब्ध असेल. या सॅमसंग फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. तसेच, यात 4400mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यासोबत वायरलेस चार्जिंग देखील आहे. फोनची सुरुवातीची किंमत $1,799 म्हणजेच सुमारे 1,42,312 रुपये आहे.

Samsung Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 900nits ब्राइटनेस आहे. फोन मधूनच फ्लिप करता येतो. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर फोनसोबत उपलब्ध आहे. Galaxy Z Flip 4 सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 12 मेगापिक्सेल आहे, तर दुसरा लेन्स देखील 12 मेगापिक्सेल आहे. समोर 10-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 3700mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यासोबत वायरलेस चार्जिंग देखील आहे. फोनची सुरुवातीची किंमत $999 म्हणजेच सुमारे 79,000 रुपये आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo