भारतीय बाजारात सध्या फोलेंडेबल स्मार्टफोन्सचे क्रेझ सुरु झाले आहे. यामध्ये Samsung चे फोल्डेबल आणि फ्लिप फोन ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करतात. अलीकडेच, Samsung ने Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. Samsung च्या या फ्लिप फोनवर तब्बल 7 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्ही Amazon India प्लॅटफॉर्मवरून हा स्मार्टफोन सवलतीसह खरेदी करू शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy Z Flip5 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy Z Flip5 5G फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 99,999 रुपये आहे. यात 8GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंट देखील आहे, ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. ई-कॉमर्स दिग्गज एचडीएफसी बँक कार्डद्वारे फोनवर 7,000 रुपयांपर्यंत झटपट सूट देत आहे. तसेच, तुम्ही ते 4,849 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकता. येथून खरेदी करा
Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल-HD+ डिस्प्ले आहे. तर, फोनच्या मागील बाजूस 3.4 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. Samsung Galaxy Z Flip5 5G फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यासह, 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 512GB स्टोरेजचा व्हेरिएंटचा पर्याय मिळतो.
Samsung Galaxy Z Flip5 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12MP मेन आणि 12MP वाइड-एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3700mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यामध्ये वायरलेस चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile