Amazing! Samsung चा ‘हा’ फोल्डेबल फोन 25,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किमतीसह हजारोंची होणार बचत। Tech News 

Amazing! Samsung चा ‘हा’ फोल्डेबल फोन 25,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किमतीसह हजारोंची होणार बचत। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे.

या फोनच्या किमतीत 25,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे.

आजकाल फोल्डेबल स्मार्टफोन्सचे ट्रेंड तरुणाईमध्ये वाढत जात आहे. मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी आपल्या ब्रँडचे जबरदस्त फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. जर तुम्ही बऱ्याच काळापासून Samsung चा फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण कंपनीने आपल्या Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. या फोनच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. होय, ऑगस्ट 2022 मध्ये लाँच झालेल्या या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 25,000 रुपयांनी कमी झाली आहे.

हे सुद्धा वाचा: Xiaomi 14 स्मार्टफोन भारतात पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच होणार लाँच, जाणून घ्या सर्व डिटेल्स। Tech News

Samsung Galaxy Z Flip 4 ची नवी किंमत

Samsung ने हा Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला होता. फोनच्या 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 89,999 आणि 94,999 रुपये होती. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे या फोनच्या किमतीत 25,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर फोनचा 128GB व्हेरिएंट 64,999 रुपयांना आणि 256GB व्हेरिएंट 69,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Z Flip 4 Price Slash
Samsung Galaxy Z Flip 4 Price Slash

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन बोरा पर्पल, ग्रेफाइट आणि पिंक गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Z Flip 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 4 कॉम्पॅक्ट 1.9-इंच लांबीच्या सुपर AMOLED कव्हर डिस्प्लेसह येतो. हा फोन उघडल्यावर वापरकर्त्यांना 6.7-इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले मिळेल. त्याबरोबरच, हा डिस्प्ले 120Hz स्मूथ आणि अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे.

विशेष मुद्द्याकडे येत या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 10MP शूटर आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 4.1 वर कार्य करेल. फोनमध्ये 3700mAh ची बॅटरी आहे, जी सुपर फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 50% पर्यंत चार्ज होते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo