Samsungचा फोल्डेबल आकर्षक स्मार्टफोन उद्या येणार, लाँचपूर्वी किंमत जाहीर, वाचा सविस्तर

Samsungचा फोल्डेबल आकर्षक स्मार्टफोन उद्या येणार, लाँचपूर्वी किंमत जाहीर, वाचा सविस्तर
HIGHLIGHTS

10 ऑगस्ट रोजी Galaxy Unpacked इव्हेंट

Samsung Galaxy Z Flip 4 उद्या लाँच होणार

त्यासोबत, Galaxy Watch 5 सीरीज आणि Galaxy Buds 2 Pro देखील लाँच होणार

Samsung 10 ऑगस्ट रोजी Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोन Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 लाँच करणार आहे. स्मार्टफोनसोबतच कंपनी या इव्हेंटमध्ये Galaxy Watch 5 सीरीज आणि Galaxy Buds 2 Pro लाँच करणार आहे.

 Tipster Winfuture.de ने अलीकडेच Galaxy Z Fold 4 सोबत Galaxy Watch 5 सिरीजची फीचर्स लीक केली आहेत. आता टिपस्टरने Galaxy Z Flip 4 ची सर्व फीचर्स उघड केली आहेत. या लीकमध्ये Samsung Galaxy Z Flip 4 ची किंमत देखील सांगण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात संपूर्ण तपशील…

हे सुद्धा वाचा : पॉकेट फ्रेंडली Broadband प्लॅन्स: 500 रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळेल 3500GB डेटा आणि मोफत कॉल

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी फोनमध्ये 1080×2640 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देऊ शकते. फोनमधील हा डिस्प्ले 21.9:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल, अशी माहिती मिळाली आहे. फोनच्या मागील पॅनलवर, कंपनी 512×260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.9-इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले देऊ शकते.

samsung galaxy z flip 4

 त्याबरोबरच, फोनमध्ये LED फ्लॅशसह दोन रियर कॅमेरे मिळतील. यामध्ये 12-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड स्नॅपर देखील आहे. फोनमध्ये दिलेला मेन कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येईल. तसेच, Galaxy Z Flip 4 मध्ये तुम्हाला 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

या व्यतिरिक्त, कंपनी हा फोन 8 GB रॅम आणि 512 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करणार आहे. तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट पाहायला मिळेल. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. तसेच, यात 3700mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. ही बॅटरी 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन Android 12 वर आधारित Samsung च्या लेटेस्ट UI वर कार्य करेल.

अपेक्षित किंमत 

samsung galaxy z flip 4

लीकनुसार, युरोपमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 1099 युरो म्हणजे जवळपास 89,300 रुपये आहे. फोनची प्री-ऑर्डर 10 ऑगस्टपासून सुरू होईल. मात्र, वापरकर्त्यांना त्याच्या खुल्या विक्रीसाठी 25 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. भारतात फोनची किंमत काय असेल याची अधिकृत माहिती उद्याच्या लॉन्च इव्हेंटमध्येच दिली जाणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo