Samsung Galaxy Z Flip 3 मिळतोय निम्म्या किमतीत, मिळतोय 53% डिस्काउंट

HIGHLIGHTS

Samsung चा हा फोल्डिंग स्मार्टफोन फक्त 44,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध

SBI बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांपर्यंतची झटपट सूट

Samsung Galaxy Z Flip 3 मिळतोय निम्म्या किमतीत, मिळतोय 53% डिस्काउंट

भारतीय ग्राहकांमध्ये फोल्डेबल फोन्स बरेच लोकप्रिय आहेत. त्यातल्या त्यात Samsung चे प्रोडक्ट्स देखील भारतात लोकप्रिय आहेत. दरम्यान, सॅमसंगकडे प्रीमियम Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. येथे सॅमसंगच्या फोल्डेबल फोनवर प्रचंड सवलत मिळतेय. तुम्ही ऑनलाइन मार्केटप्लेसमधून Galaxy Z Flip 3 45,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Samsung Galaxy Z Flip 3 वरील ऑफर्स 

 Samsung चा हा फोल्डिंग स्मार्टफोन फक्त 44,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 53% डिस्काउंटसह सूचिबद्ध आहे. ही ऑफर फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटवर उपलब्ध आहे. याशिवाय, बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळणार आहे.

यासह, नो कॉस्ट EMI द्वारे खरेदी करता येईल. यासाठी तुम्हला दरमहा 7,500 रुपये भरावे लागतील. त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल 28 हजार रुपयांची सूट मिळेल.     

Samsung Galaxy Z Flip 3

  या फोनमध्ये तुम्हाला 1.9-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये नोटिफिकेशन्स आणि कॉल्स चेक करता येतील. या स्क्रीनचा साईज 6.7 इंच लांबीचा होतो.  याशिवाय, फोनमध्ये 3,300mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगच्या फोल्डेबल फोनमध्ये 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर, 10-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील तुम्हाला मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo