Samsung Galaxy Unpacked 2023: या वर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये ‘हे’ जबरदस्त डिवाइस होणार लाँच

Samsung Galaxy Unpacked 2023: या वर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये ‘हे’ जबरदस्त डिवाइस होणार लाँच
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Unpacked 2023 इव्हेंट आज

इव्हेंटमध्ये Galaxy Book 3 सिरीज आणि नवीन Galaxy S23 सिरीजचे अनावरण करणार आहे.

इव्हेंटमध्ये, कंपनी आपले अनेक नवीनतम उपकरणे लाँच करणार आहे.

Samsung त्याच्या Galaxy Unpacked 2023 इव्हेंटमध्ये Galaxy Book 3 सिरीज आणि नवीन Galaxy S23 सिरीजचे अनावरण करणार आहे. हा कार्यक्रम आज 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील मेसोनिक ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. इव्हेंटमध्ये, कंपनी आपले अनेक नवीनतम उपकरणे लाँच करणार आहे. 

हे सुद्धा वाचा : स्मार्टफोन चार्ज करतानाही 'ही' चूक करू नका, अन्यथा पडेल महागात…

Samsung Galaxy S23 सिरीज 

Samsung Galaxy S23 सिरीज सॅमसंगची पुढील फ्लॅगशिप आणि टॉप स्मार्टफोन सिरीज असणार आहे. या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लॉन्च केले जातील. हे तीनही सॅमसंग फोन Android 13 आधारित One UI 5.1 सह ऑफर केले जातील. Galaxy S23 मध्ये 6.1-इंच लांबीचा फुल HD Plus AMOLED 2X डिस्प्ले मिळेल, तर Galaxy S23+ ला HDR10+ सपोर्ट आणि Gorilla Glass Victus 2 संरक्षणासह 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. सर्व फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि किमान 8 GB RAM सह ऑफर केले जातील.

Samsung Galaxy S23 सिरीजमधील पहिल्या दोन फोनमध्ये तीन रियर कॅमेरे मिळतील, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी सपोर्ट असणारी प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेलची असेल. सेकंडरी लेन्स 12 मेगापिक्सल्सची असेल, जी अल्ट्रा वाइड अँगल असेल. तिसऱ्या लेन्सला 10-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel कॅमेरा मिळेल असा दावाही केला जात आहे.

अपेक्षित किंमत : 

  Galaxy S23 च्या बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपये असेल, असा दावा कंपनीने केला आहे. या किंमतीत, 128 GB स्टोरेज असलेले मॉडेल 8 GB रॅमसह उपलब्ध असेल.

Galaxy Book 3 सिरीज 

Samsung त्याच्या Galaxy Unpacked 2023 इव्हेंटमध्ये Galaxy Book 3 सिरीज फ्लॅगशिप लॅपटॉप लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप लॅपटॉप सीरीजमध्ये Galaxy Book 3 Pro 360, Galaxy Book 3 Pro आणि Galaxy Book 3 360 लॉन्च केले जाऊ शकतात. 

Galaxy Book 3 Pro 360 Windows 11 सह येईल आणि 13व्या जनरेशनच्या Intel Evo i7 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. लॅपटॉपमध्ये मायक्रो SD कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक आणि USB पोर्टसह 14-इंच लांबीचा डिस्प्ले मिळू शकतो. Galaxy Book 3 Pro कमी बेझलसह सादर केला जाईल.

हा लॅपटॉप 14 इंच आणि 16 इंच 3K AMOLED डिस्प्ले अशा दोन स्क्रीनसह येण्याची अपेक्षा आहे. लॅपटॉप Windows 11 सह येईल आणि 13th Gen Intel Core i5 आणि Intel Core i7 प्रोसेसर पर्यायांद्वारे समर्थित असेल. हे 16 GB पर्यंत DDR5 RAM आणि 1TB NVMe PCIe Gen4 SSD स्टोरेज पर्यंत मिळवू शकते. या लॅपटॉपमध्ये Intel Iris Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्स दिले जाऊ शकतात. Galaxy Book 3 Pro ला मोठा ट्रॅकपॅड आणि मेम्ब्रेन कीबोर्ड मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo