Samsung Galaxy S8 Lite म्हणजे Samsung Galaxy S Light Luxury आज चीन मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च
नावावरून तुम्हाला समजले असेल की हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी S8 Lite च्या रूपात लॉन्च होणार आहे, याचा अर्थ असा की हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी S8 च्या छोट्या वेरिएंट च्या रूपात लॉन्च केला जाईल.
खुप दिवसांपासुन चर्चा चालू होती की सॅमसंग आपल्या सॅमसंग गॅलेक्सी S8 च्या छोट्या वेरिएंट वर काम करत आहे. या डिवाइस ला सॅमसंग गॅलेक्सी S8 Lite नाव दिले जात आहे, विशेष म्हणजे हा चीन मध्ये आज लॉन्च केला जाईल अशा बातम्या येत आहेत.
ही माहिती एक मीडिया इनवाइट च्या माध्यामातून अली आहे ज्यानुसार आज चीन मध्ये हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी S8 Lite नावा ऐवजी एका नवीन नावाने लॉन्च केला जाऊ शकतो, जे सॅमसंग गॅलेक्सी S Light Luxury असेल. या बातमी वर विश्वास ठेवल्यास हा डिवाइस या नवीन नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.
या डिवाइस बद्दल मागील काही दिवसांपासून लीक्स आणि रुमर्स येत आहेत आणि या लीक्स आणि बातम्यां वरून आम्हाला समजले आहे की या डिवाइस मध्ये काय काय असेल. या डिवाइस च्या फ्रंट ला तुम्हाला एक इनफिनिटी डिस्प्ले मिळत आहे. त्याचबरोबर यात Bixby बटन सोबत एक फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. पण या डिवाइस मध्ये हार्ट रेट मॉनिटर दिसला नाही.
सॅमसंग गॅलेक्सी S8 Lite स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर याचा मोठा वेरिएंट्स मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 5.8-इंचाचा FHD+ इनफिनिटी डिस्प्ले मिळेल, जी 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन असेल. या डिवाइस मध्ये सॅमसंग गॅलेक्सी S8 सारखीच फिंगरप्रिंट प्लेसमेंट मिळू शकते, या प्लेसमेंट बद्दल खुप हंगामा पण झाला होता. कारण ती कॅमेराच्या अगदी खाली होती ज्यामुळे लोकांना ती ओळखणे काठी जात होते.
फोन मध्ये तुम्हाला एक 16-मेगापिक्सल चा कॅमेरा मिळत आहे त्याचबरोबर फोन मध्ये एक LED फ्लॅश पण देण्यात आला आहे, फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे.
फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 4GB रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. या डिवाइस बद्दल अजुन सांगायचे तर हा IP68 च्या रेटिंग सह लॉन्च केला जाईल. फोन ला एंड्राइड Oreo चा सपोर्ट पण मिळेल आणि यात फास्ट चार्जिंग सह एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण असेल.