ह्या स्मार्टफोनसह कंपनी १ वर्षाची आणि बॉक्समध्ये उपलब्ध एक्सेसरीजवर 6 महिन्याची वॉरंटी देत आहे. सॅमसंग गॅलेक्सी S5 सह कंपनी एक्सचेंज ऑफरसुद्धा देत आहे. अॅपच्या माध्यमातून एक्सचेंजमध्ये हा १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S5 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे. आता हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी ह्या स्मार्टफोनला ५१,५०० रुपयाच्या किंमतीसह भारतात लाँच केला गेला होता.
जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी S5 स्मार्टफोनला खरेदी करु इच्छिता तर आपण १७,९९९ रुपयाच्या किंमतीत फ्लिपकार्ट अॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता. जर आपण ह्या स्मार्टफोनला फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुन घेतले, तर आपल्याला २१,९९९ रुपये मोजावे लागतील. ह्या स्मार्टफोनसह १ वर्षाची आणि बॉक्समध्ये उपलब्ध एक्सेसरीजवर 6 महिन्याची वॉरंटी कंपनी देत आहे. सॅमसंग गॅलेक्सी S5 सह कंपनी एक्सचेंज ऑफरसुद्धा देत आहे. अॅपच्या माध्यमातून एक्सचेंजमध्ये हा १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. स्मार्टफोनसह EMI आणि कॅश ऑन डिलिव्हरी सारखे ऑफरसुद्धा दिले जात आहेत.
फ्लिपकार्ट ह्या स्मार्टफोनला डब्ल्यूएस रिटेलच्या माध्यमातून उपलब्ध करत आहे, जे की फ्लिपकार्ट अडवांटेज सर्टिफाइड रिटेलर आहे. ह्याचा अर्थ असा आहे की, हा ह्या गोष्टीची हमी देतो की, फोन ओरिजनल असेल आणि गॅरंटी आणि वॉरंटी मोबाईल निर्माता (सॅमसंग) कडून ती देण्यात येईल.
सॅमसंग गॅलेक्सी S5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.