HIGHLIGHTS
Samsung Galaxy S23 Ultra हा एक फ्लॅगशिप फोन
सॅमसंगच्या साईटवर तुम्हाला या फोनवर बरेच ऑफर्स मिळतील.
इंस्टंट बँक कॅशबॅकसह 8,000 रुपयांच्या सवलतीचा लाभ
Samsung Galaxy S23 Ultra हा एक फ्लॅगशिप फोन आहे. जर तुमचे बजेट हाय असेल आणि तुम्हाला दमदार फीचर्ससह फोन हवा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनवर तुम्ही 8 हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट घेऊ शकता.
Surveyसॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये आहे. तर, 12GB रॅमसह 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1 लाख 34 हजार 999 रुपये आहे. सॅमसंगच्या साईटवर तुम्हाला या फोनवर बरेच ऑफर्स मिळतील.
यावर 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI सुविधा दिली जात आहे. फोनसह 4,875 रुपये प्रति महिना प्रारंभिक नो कॉस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावरील बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Samsung Galaxy S23 Ultra वर इंस्टंट बँक कॅशबॅकसह 8,000 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळेल.
याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या डिव्हाइसच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
सॅमसंगने या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा एज क्वाड HD प्लस डायनॅमिक AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी 200-मेगापिक्सेल प्राइमरी, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 10-मेगापिक्सेल टेलीफोटो आणि 10x ऑप्टिकल झूमसह आणखी 10-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile