Exclusive: Samsung Galaxy S23 रेंडर आणि डिझाइन्स समोर आले, वेगवेगळ्या अँगल्सने फोन बघा

Exclusive: Samsung Galaxy S23 रेंडर आणि डिझाइन्स समोर आले, वेगवेगळ्या अँगल्सने फोन बघा
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 5K रेंडर लीक झाले

S23 चे रेंडर फोनच्या डिझाईनचे पहिले लुक

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंच लांबीचे डिस्प्ले मिळेल

Samsung Galaxy S23 सिरीज पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होणार, अशी अपेक्षा आहे, परंतु त्याच्या लॉन्चच्या अगोदर, Digit तुमच्यासाठी कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप सिरीजमधील एका फोनचा खास फर्स्ट लुक घेऊन येत आहे. लोकप्रिय टिपस्टर OnLeaks सह भागीदारीत, Digit आता तुमच्यासाठी आगामी Samsung Galaxy S23 चे पूर्ण 360° 5K रेंडर घेऊन आला आहे. या लीकमुळे फोनचे डिझाइन आणि डिव्हाइसच्या मागील बाजूस असलेल्या नवीन कॅमेर्‍याची स्थितीच नाही तर फोनची अचूक डायमेन्शन्स देखील दिसून येतात. 

SAMSUNG GALAXY S23: डिझाइन लीक 

 

 

यापूर्वी, आपण अशा अफवा पाहिल्या आहेत की, Samsung Galaxy S23 ला त्याच्या आधीच्या फोनच्या तुलनेत फक्त डायमेन्शनमध्ये किरकोळ वाढ मिळू शकते आणि आता, OnLeaks ने अशा दाव्यांमागील फोनचे डायमेन्शन उघड करून आपला दावा केला आहे. लीकनुसार, फोन Samsung Galaxy S22 पेक्षा थोडा मोठा असेल म्हणजेच अंदाजे 146.3 x 70.8 x 7.6mm आकाराचा असेल. रेंडर्स हे देखील उघड करतात की, मागील वर्षी जो कॅमेरा मॉड्यूल पहिला होता, त्यावरून Galaxy S23 Galaxy S22 प्रमाणेच डिझाइन वापरेल. 

त्याऐवजी, फोन एक अपडेटेड रियर कॅमेरा डिझाइनसह येईल, जो Galaxy S22 Ultra द्वारे प्रेरित आहे. हे मागील पॅनेलवरील तीन कॅमेरे कोणत्याही बम्प किंवा फेन्सशिवाय पाहिले गेले आहेत. मात्र, आत्ता आम्हाला कॅमेऱ्यांबद्दल इतकेच माहित आहे.

 रेंडर सूचित करतात की फोन पूर्वीपेक्षा किंचित रुंद बेझलसह येईल. डिस्प्लेचा आकार समान असेल. OnLeaks ने शेअर केलेल्या माहितीनुसार, S23 चे डिस्प्ले 6.1-इंच लांबीचे तिरपे असेल. पुन्हा, पुष्टीकरण नाही, परंतु हा डिस्प्ले 120Hz वर रीफ्रेश होण्याची शक्यता आहे. रेंडर्सवरून असेही दिसून आले आहे की, डिस्प्लेच्या मध्यभागी एक पंच-होल असेल, जे पूर्वीच्या अफवांनुसार, 12MP शूटर ठेवू शकते. 

GALAXY S23: संभावित स्पेसिफिकेशन्स 

 इतर इंटर्नलसाठी, आमच्याकडे यावेळी कोणतेही पुष्टीकरण नाही. तथापि, मागील लीकने आम्हाला फोनबद्दल काही माहिती दिली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC, भरपूर रॅम आणि Galaxy S22 पेक्षा 5 टक्के मोठ्या बॅटरी पॅकसह येऊ शकतो.

आत्तासाठी, आम्हाला आगामी Galaxy S23 बद्दल इतकेच माहित आहे. मात्र, डिव्हाइसबद्दल सर्व नवीन माहितीसाठी ही साईट फॉलो करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo