खुशखबर ! Samsung चा प्रीमियम फोन मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांनी स्वस्त, ‘ही’ ऑफर चुकवू नका

HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 वर Amazon देतेय प्रचंड सवलत

HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर फ्लॅट 5000 रुपयांची सूट

Samsung Galaxy S23 वर एकूण 17% सूट मिळत आहे.

खुशखबर ! Samsung चा प्रीमियम फोन मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांनी स्वस्त, ‘ही’ ऑफर चुकवू नका

तुम्हाला माहितीच असेल की, जर तुम्हाला मोठ्या सवलती जुने फोन मॉडेल्स किंवा मिड रेंज फोन्सवर मिळतात. मात्र नवीन लाँच झालेल्या फोनवर मोठी सवलत मिळणे, जरा कठीण आहे. आज आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, Samsung चा प्रीमियम स्मार्टफोन भारी सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. ही डील Amazon वर मिळत आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Samsung Galaxy S23 ची किमंत

Samsung Galaxy S23 च्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत Amazon वर 95,999 रुपये आहे. पण या फोनवर एकूण 17% सूट मिळत आहे. या सवलतीसह फोन थेट 16,000 रुपयांच्या सवलतीसह फक्त 79,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. 

बँक ऑफर्स : 

HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर फ्लॅट 5000 रुपयांची सूट मिळत आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर 1000 रुपयांपर्यंत 10% झटपट सूट आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1250 रुपयांपर्यंत 10% इन्स्टंट डिस्काउंट आहे. तर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्कॉउंट इ. उपलब्ध आहेत. 

यासह हा सॅमसंग फ्लॅगशिप डिव्हाइस आणखी कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभदेखील घेता येईल. यामध्ये तुमच्यासाठी 30,800 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळत आहे, ज्यासह 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo