फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. सेल अंतर्गत Samsung Galaxy S21 FE अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. मात्र, तुम्हाला आता घाई करावी लागेल, कारण सेल फक्त काही दिवसांसाठी लाईव्ह असेल. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्हाला किती कमी किंमतीत Galaxy S21 FE खरेदी करता येईल.
फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S21 FE फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 74,999 रुपये आहे. मात्र, साईटवर हा फोन 46% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या सवलतीसह फोन 39,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
ऑफर्स
Samsung Axis Bank क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% कॅशबॅक उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक दिला जाणार आहे. तसेच, फोन खरेदीसाठी EMI चा पर्याय देखील देण्यात येणार आहे. तुम्हाला दरमहा 4,445 रुपये देऊन नो कॉस्ट EMI सह फोन खरेदी करता येईल.
जर तुम्हाला हा फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची इच्छा आहे. तर, तुमच्याकडे जुना स्मार्टफोन हवा. म्हणजेच, तुम्हाला फोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरसह तुम्ही तब्बल 35,000 रुपयांची सूट मिळवू शकता. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान स्मार्टफोनची स्थिती उत्तम असायला हवी. संपूर्ण सूट मिळवण्यात यशस्वी झाल्यास फोन फक्त 4,999 रुपयांत खरेदी करता येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile