Flipkart च्या आगामी सेलमध्ये निम्म्या किमतीत मिळेल Samsung फोन, वाचा डिटेल्स

HIGHLIGHTS

Flipkart Big Savings Days 2023 सेल 5 मे पासून सुरू होणार

Samsung Galaxy S21 FE वर एक अतिशय खास डील

डिवाइसवर 25,000 रुपयांची मोठी सूट दिली जाईल.

Flipkart च्या आगामी सेलमध्ये निम्म्या किमतीत मिळेल Samsung फोन, वाचा डिटेल्स

Flipkart आणि Amazon India दोघेही आपापल्या प्लॅटफॉर्मवर नव्या मोठ्या सेलचे आयोजन करत आहेत. Flipkart Big Savings Days 2023 सेल 5 मे पासून सुरू होणार आहे तर Plus सदस्यांसाठी हा सेल एक दिवस अगोदरंच सुरू होणार आहे. सेल दरम्यान Samsung Galaxy S21 FE वर एक अतिशय खास डील ऑफर केली जाणार आहे, जेणेकरून फोन फक्त 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Samsung Galaxy S21 FE Flipkart ऑफर

  Samsung Galaxy S21 FE सध्या 54,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. Samsung Galaxy S21 FE आगामी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डेज 2023 सेल दरम्यान 29,999 रुपयांना ऑफर केला जाईल. या किमतीत कार्ड ऑफर, कॅशबॅक आणि डिस्काउंट इत्यादी विविध ऑफर्स समाविष्ट असतील. म्हणजेच डिवाइसवर 25,000 रुपयांची मोठी सूट दिली जाईल.

Samsung Galaxy S21 FE 

Samsung Galaxy S21 FE मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. डिव्हाइस Android 13 वर चालेल. मात्र, डिवाइसला Android 15 पर्यंत सर्व प्रमुख अपडेट्स मिळणार आहेत.

 डिव्हाइसमध्ये 12-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळत आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo