Samsung चा 75,000 रुपयांचा फोन थेट 30,000 मध्ये खरेदी करा, ग्राहकांची होणार मोठी बचत

Samsung चा 75,000 रुपयांचा फोन थेट 30,000 मध्ये खरेदी करा, ग्राहकांची होणार मोठी बचत
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S20 FE 5G वर तब्बल 60 % सूट

Amazon वर तब्ब्ल 45,000 रुपयांची बचत होईल.

8GB/128GB व्हेरिएंटवर ही ऑफर उपलब्ध

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. येथून तुम्ही मोठ्या बचतीसह Samsungचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनी 74,999 रुपये किंमतीचा Samsung Galaxy S20 FE 5G फोन फक्त 29,999 रुपयांना विकत आहे.

हे सुद्धा वाचा : Bsnl च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा, ग्राहकांची मज्जाचं मजा

 Samsung Galaxy S20 FE 5G वर ऑफर 

 एखाद्या वापरकर्त्याने Amazon च्या बंपर ऑफरचा लाभ घेतला, तर त्याची तब्ब्ल 45,000 रुपयांची बचत होईल, कारण कंपनी या फोनवर 60 % सूट देत आहे. याशिवाय, वापरकर्ते निवडक बँक कार्डद्वारे अतिरिक्त बचत देखील करू शकतात. त्याचबरोबर सॅमसंगचा महागडा फोन विनाखर्च EMI वर खरेदी करण्याचीही संधी आहे. येथून खरेदी करा 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

ही ऑफर Samsung Galaxy S20 FE 5G च्या 8GB/128GB व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो. याशिवाय यामध्ये Qualcomm Snapdragon 865 चिपसेट सपोर्ट आहे. युजर्सना यामध्ये 6.5 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. यामध्ये, 120 Hz चा रिफ्रेश रेट देखील दिला गेला आहे.

पॉवर बॅकअपसाठी, सॅमसंगच्या प्रीमियम फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोन त्वरीत चार्ज करण्यासाठी सुपर फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्हाला फास्ट वायरलेस चार्जिंग, फिंगर प्रिंट सेन्सर, मायक्रो SD कार्ड स्लॉट यांसारख्या फीचर्सचा लाभ देखील मिळेल. 

फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय 8 मेगापिक्सलचा टेली कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळेल. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo