भारतात लाँच झाला सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 चा ड्यूल सिम व्हर्जन

भारतात लाँच झाला सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 चा ड्यूल सिम व्हर्जन
HIGHLIGHTS

सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 चा ड्यूल सिम व्हर्जन भारतात उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. ह्याची किंमत ५१,४०० रुपये आहे आणि जर आपण ह्याचा 64GB चा व्हर्जन घेता तर तो आपल्याला ५७,४०० रुपयात मिळेल.

हा स्मार्टफोन भारतात मिळणे सुरु झाले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याची किंमत ५१,४०० रुपये आहे आणि जर आपण ह्याचा 64GB चा व्हर्जन घेता तर तो आपल्याला ५७,४०० रुपयात मिळेल. ह्या स्मार्टफोन सिंगल सिम व्हर्जन सप्टेंबरमध्ये लाँच झाला आहे. ह्याचा ड्यूल सिम व्हर्जन जो आता लाँच झाला आहे,त्या स्मार्टफोनमध्ये सिमशिवाय इतर सर्वकाही तसेच ठेवण्यात आले आहे. काहीच बदलले नाही.

 

ह्या ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याची पिक्सेल रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे आणि पिक्सेल तीव्रता 515ppi आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 वर आधारित सॅमसंगच्या टचविज UI वर चालतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस 7420 सह क्वाड-कोर 1.5GHz आणि क्वाड-कोर 2.1GHz प्रोसेसरसह 4GB ची रॅम दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

तर सिंगल सिम व्हर्जनमध्ये 4GB ची रॅम मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा मिळत आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. जसे की आपण मागील वर्षी लाँच झालेल्या Note 4 मध्ये पाहिले होते तसेच गॅलेक्सी नोट 5 मध्येही ५.७ इंचाची QHD SAMOLED डिस्प्ले मिळत आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये मटेरियल बदलले गेले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी S6 सारखी ग्लास मागील बाजूस दिली गेली आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली वक्र आहे.

त्याशिवाय हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपसह सॅमसंगचे टचविज UI वर चालतो. ह्यात 3000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. ही एक नॉन-रिमूव्हेबल बॅटरी आहे. हा फोन दोन्ही वायरलेस आणि क्विक चार्ज तंत्राला सपोर्ट करतो.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo