SAMSUNG GALAXY M40 चा पुढील सेल 20 जूनला, अश्या मिळतील ऑफर्स

Updated on 19-Jun-2019
HIGHLIGHTS

अमेझॉन आणि सॅमसंग वेबसाईट वर सेल साठी उपलब्ध आहे डिवाइस

दुपारी 12 वाजता फ्लॅश सेल मध्ये विकला जाईल Samsung Galaxy M40

6GB RAM + 128GB स्टोरेज सह येतो Galaxy M40

सॅमसंगचा अलीकडेच लॉन्च झालेला Samsung Galaxy M40 स्मार्टफोन पुन्हा एकदा सेल साठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 20 जूनला दुपारी 12 वाजता फ्लॅश सेल मध्ये ईकॉमर्स साइट अमेझॉन आणि सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर वरून विकत घेऊ शकता. सॅमसंग गॅलेक्सी M40 जून 2019 मधेच लॉन्च केला गेला होता. 

Samsung Galaxy M40 जर यूजर्स Amazon India वरून विकत घेत असतील किंवा सॅमसंग साइट वरून तर त्यांच्यासाठी काही ऑफर्स पण जाहीर करण्यात आल्या आहेत. हा फोन 6GB RAM + 128GB स्टोरेज सह येतो आणि यात तुम्हाला full-HD+ Infinity-O Display मिळतो. विशेष म्हणजे या दुसऱ्या सेलची माहिती Samsung India ने अधिकृत Twitter अकाउंट वरून दिली आहे.   

https://twitter.com/SamsungIndia/status/1140886373089587206?ref_src=twsrc%5Etfw

Samsung Galaxy M40 Price

भारतातील Samsung Galaxy M40 ची किंमत पाहता हा स्मार्टफोन 19,990 रुपयांमध्ये मिळतो ज्यात तुम्हाला 6GB RAM + 128GB स्टोरेज ऑप्शन मिळतो. तुम्ही हा फोन Midnight Blue आणि Seawater Blue कलर मध्ये विकत घेऊ शकता. 

SAMSUNG GALAXY M40 OFFERS

Samsung Galaxy M40 सेल ऑफर्स अंतर्गत रिलायंस जियो यूजर्सना 4G Double-Data ऑफर मिळत आहे. हा फायदा 198 किंवा 299 रुपयांच्या प्लान वर आहे. ऑफर अंतर्गत यूजर्सना 3,110 रुपयांचे बेनिफिट मिळतात. कंपनीने वोडाफोन आणि आइडियाशी पण भागेदारी केली आहे. सोबतच 255 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या यूजर्सना 3,750 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि 18 महिन्यांपर्यंत 0.5GB डेटा मिळेल. 

SAMSUNG GALAXY M40 SPECIFICATIONS

Samsung Galaxy M40 मध्ये तुम्हाला 6.3-inch full-HD+ TFT LCD Infinity-O display रिजॉल्यूशन 2340×1080 पिक्सल्स सह मिळतो. गॅलेक्सी M40 मध्ये कंपनीने 3,500 mAh बॅटरी दिली आहे जी 15 watts USB Type-C fast charging सह येते. ऑप्टिक्स अंतर्गत फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या  बॅक पॅनल वर 32 मेगापिक्सल+5 मेगापिक्सल+8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप आहे. 

स्मार्टफोन मध्ये octa-core Qualcomm Snapdragon 675 SoC सह 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. फोनची स्टोरेज माइक्रो एसडी कार्डने वाढवता येते. फोनच्या मागील बाजूस रियर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. त्याचबरोबर यात यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग आहे. फोन मध्ये 3.5mm ऑडियो जॅक नाही. स्मार्टफोन एंड्रॉइड 9 पाई बेस्ड OneUI आउट ऑफ द बॉक्स सह येतो. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :