ह्यात ५ इंचाची डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल असेल. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि ६४ बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसरसुद्धा असू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लवकरच लाँच करणार आहे. मात्र ह्याच्या किंमतीबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Survey
✅ Thank you for completing the survey!
खरे पाहता अलीकडेच, सॅमसंग गॅलेक्सी J3 स्मार्टफोनसंबंधी काही माहिती समोर आली होती. गीकबेंचने मागील महिन्यात ह्या फोनला लिस्ट केले होते. कंपनी ह्या स्मार्टफोनला लवकरच लाँच करणाराय. असे सांगितले जातय की, गीकबेंचवर ह्या फोनचा मॉडेल नंबर SM-J3109 सह लिस्ट केला आहे, आणि ह्याची 2G, 3G आणि 4G LTEसाठी चाचणी केली गेली आहे. याचाच अर्थ असा की, हा एक 4G स्मार्टफोन असेल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल असेल. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसरसुद्धा असेल. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ह्यात ८ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो.