Samsung Galaxy F55 5G ची किंमत लाँचपूर्वीच Leak! तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन? Tech News 

Samsung Galaxy F55 5G ची किंमत लाँचपूर्वीच Leak! तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन? Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F55 5G फोन लवकरच भारतात होणार लाँच

लाँच डेटपूर्वी डिव्हाइसच्या किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित संपूर्ण तपशील लीक

Samsung Galaxy F55 5G तीन व्हेरियंटमध्ये भारतात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Samsung च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा सध्या जिकडे तिकडे सुरु आहे. Samsung भारतात प्रथमच लेदर बॅक फिनिशसह स्मार्टफोन घेऊन येत आहे. Samsung Galaxy F55 5G नावाने लवकरच बाजारात येणार आहे. कंपनीने या फोनच्या टीझर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आता लाँच डेटपूर्वी डिव्हाइसच्या किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित संपूर्ण तपशील लीक केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात नवा Samsung Galaxy F55 5G फोन बजेटमध्ये बसेल की नाही?

Samsung Galaxy F55 5G लीक किंमत

Samsung Galaxy F55 5G तीन व्हेरियंटमध्ये भारतात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच पुढे आलेल्या लीकनुसार, फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 26,999 रुपये असू शकते. तर, मिड मॉडेल 8GB RAM + 256GB पर्यायाची किंमत 29,999 रुपये असण्याची शक्यता आहे. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12GB RAM + 256GB साठी 32,999 रुपये असेल, अशी माहिती मिळाली आह. हा फोन रेझिन ब्लॅक आणि ऍप्रिकॉट क्रश कलर ऑप्शन्समध्ये येऊ शकतो.

Samsung Galaxy F55 5G with Vegan Leather Finish to launch in India soon: What to expect
Samsung Galaxy F55 5G

Samsung Galaxy F55 5G चे लीक तपशील

लीकनुसार, Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर AMOLED + Infinity-O डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिळेल. एवढेच नाही तर, ताज्या लीकनुसार, Samsung प्रथमच गॅलेक्सी F सीरीज स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम देण्याची शक्यता आहे.

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy F55 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये OIS सह 50MP प्रायमरी आणि 8MP + 2MP कॅमेरा सेन्सर असू शकतो. आकर्षक सेल्फीसाठी समोर 50MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. पॉवरसाठी, फोनमध्ये वापरकर्त्यांना 45W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळणार, असे बोलले जात आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 4 वर्षांचे OS अपडेट + 5 वर्षांची सुरक्षा अपडेट, Samsung Wallet, Voice फोकस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर इ. ऑप्शन मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo