Limited Time Deal! नुकतेच लाँच झालेल्या Samsung Galaxy F15 5G वर मिळतोय Discount, स्वस्तात खरेदी करण्याची संधी

 Limited Time Deal! नुकतेच लाँच झालेल्या Samsung Galaxy F15 5G वर मिळतोय Discount, स्वस्तात खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F15 5G भारतीय बाजारात 4 मार्च 2024 रोजी लाँच केला होता.

Samsung Galaxy F15 5G या स्मार्टफोनवर ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

ही ऑफर मर्यादित काळासाठी असून 10 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत चालेल.

Samsung ने आपला स्वस्त 5G फोन Galaxy F15 5G भारतीय बाजारात 4 मार्च 2024 रोजी लाँच केला आहे. हा मोबाईल 6GB RAM, 50MP कॅमेरा, सॅमोलेड स्क्रीन आणि 6,000mAh बॅटरी सारख्या फीचर्ससह सादर केला गेला आहे. दरम्यान, हा फोन लाँच झाल्याच्या अवघ्या एक महिन्यानंतर कंपनीने Galaxy F15 5G वर डिस्काउंट जारी केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy F15 5G वरील ऑफर्स-

samsung galaxy f15 5g
samsung galaxy f15 5g

Samsung Galaxy F15 5G ची किंमत

Samsung Galaxy F15 5G दोन रॅम व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅम समाविष्ट आहे. फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये इतकी आहे. मात्र, या नवीनतम स्मार्टफोनवर आता डिस्काउंट देखील जरी करण्यात आला आहे. Samsung F15 5G फोन लाईट ग्रीन, लाईट व्हॉयलेट आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच आज हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 12,499 आणि 13,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. तर, Samsung ची स्कीम लिमिटेड टाइमसाठी म्हणजेच केवळ 20 दिवसांसाठी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ऑफर 10 एप्रिलपासून सुरू झाली असून 30 एप्रिलपर्यंत चालेल. या तारखांच्या दरम्यान Samsung Galaxy F15 5G तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. कंपनीची ही ऑफर ऑफलाइन मार्केटमध्ये जारी करण्यात आली आहे, जी सॅमसंग स्टोअर्ससह मोबाईल शॉप्स आणि रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F15 5G चे मुख्य तपशील

Samsung Galaxy F15 5G features
Samsung Galaxy F15 5G features

Samsung Galaxy F15 5G फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD+ वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटवर चालतो. त्याबरोबरच, हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 50MP मुख्य सेन्सर, 5MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. तर Galaxy F15 5G 13MP सेल्फी कॅमेराला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, हा मोबाइल 6,000mAh बॅटरीवर लॉन्च करण्यात आला आहे, जी 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. लक्षात घ्या, कंपनीचा दावा आहे की हा 2 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo