Price Leak! Samsung Galaxy F15 5G ची किंमत लाँचपूर्वीच उघड, Affordable किमतीत होणार दाखल।Tech News
Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन 4 मार्च रोजी भारतात लाँच होणार
Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केला जाणार आहे.
Samsung Galaxy A15 5G फोनची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन 4 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँचपूर्वी फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत. आता लाँचच्या काही दिवसांआधी, कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती देखील अधिकृतपणे उघड केली आहे. यासोबतच, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची लीक किंमत आणि इतर सर्व तपशील-
SurveySamsung Galaxy F15 5G ची किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy F15 5G फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. Samsung Galaxy F15 5G फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईट देखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने या फोनची किंमत अनावरण केली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, या फोनची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोन फ्लिपकार्टवर 11,XXX च्या किमतीत सूचीबद्ध आहे. यासह काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळणार आहे.
@MediaTekIndia Well, say no to compromises and yes to #Fun because the #GalaxyF15 5G with segment only* 6000mAh Battery, sAMOLED Display, 4gen android upgrades all #PoweredByMediaTek Dimensity 6100+ processor is launching on 4th March, 12 noon. Get notified:… https://t.co/aLNgjoLvKz pic.twitter.com/AXPTKDRATS
— Samsung India (@SamsungIndia) February 21, 2024
Samsung Galaxy F15 5G अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
Flipkart च्या लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy F15 फोन AMOLED डिस्प्लेसह येईल. त्याबरोबरच, डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वॉटरड्रॉप नॉच देखील देण्यात आला आहे. याशिवाय, सुरळीत कामकाजासाठी हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनचे Android व्हर्जन अपग्रेड आणि पाच वर्षांपर्यंत सुरक्षा पॅच अपडेट्स देखील मिळतील.

Samsung Galaxy A15 5G चे स्पेसिफिकेशन्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने आपल्या Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनचा नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. या फोनचा हा नवीन स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटसह समर्थित आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile