SAMSUNG चा हा स्मार्टफोन 9 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आकर्षक फीचर्स

HIGHLIGHTS

SAMSUNG च्या आणखी एका फोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy A32 फोन जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त

फोनची सुरुवातीची किमंत आता 18,899 रुपये

SAMSUNG चा हा स्मार्टफोन 9 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आकर्षक फीचर्स

SAMSUNG दररोज आपल्या स्मार्टफोन्सच्या किमती कमी करत आहे. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A32 हा फोन आता पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाला आहे. हा फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 6 GB रॅम वेरिएंटची किंमत 24,999 रुपये होती. परंतु आता तुम्ही तो 18,899 रुपयांना खरेदी करता येईल. 27,999 रुपयांच्या किंमतीसह येणार्‍या फोनचा 8 GB रॅम व्हेरिएंट आता 18,840 रुपये झाला आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला 13,500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Shah Rukh Khanवेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण करणार? या OTT प्लॅटफॉर्मवर होईल स्ट्रीम

Samsung Galaxy A32 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंच लांबीचा सुपर AMOLED फुल HD + इन्फिनिटी-यू डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश रेट आणि 800 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. हा सॅमसंग फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

या फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 1 TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी कंपनी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह चार कॅमेरे देत आहे. यामध्ये 64-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 5-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 

याशिवाय, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0 आणि GPS सारखे पर्याय मिळतील. हा फोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo