Samsung Galaxy A15 5G फोन 3000 रुपयांनी झाला स्वस्त, Popular स्मार्टफोनची किंमत कंपनीने केली कमी। Tech News 

Samsung Galaxy A15 5G फोन 3000 रुपयांनी झाला स्वस्त, Popular स्मार्टफोनची किंमत कंपनीने केली कमी। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A15 फोनच्या किंमतीत 3000 रुपयांची घट

कंपनीने 128GB स्टोरेजची किंमत 1500 रुपयांनी कमी केली.

Samsung Galaxy A15 फोन Mediatek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Samsung ने अलीडकेच Samsung Galaxy A15 5G फोन लाँच केला होता. दरम्यान, कंपनीने आता Samsung Galaxy A15 5G फोनची किंमत कमी केली आहे. होय, Samsung Galaxy A15 फोनच्या किंमतीत 3000 रुपयांची घट करण्यात आली आहे. या फोनची नवीन किंमत साइटवर लाइव्ह झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात लोकप्रिय स्मार्टफोनची नवीन किंमत-

हे सुद्धा वाचा: 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord CE 4 फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि 5 Powerful फीचर्स। Tech News

Samsung Galaxy A15 5G Price leak
Samsung Galaxy A15 5G

Samsung Galaxy A15 5G च्या किमतीत कपात

Samsung Galaxy A15 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 19,499 रुपये होती. तर, 256GB स्टोरेज व्हेरिएंट 22,499 रुपयांना उपलब्ध होता. तर, कंपनीने आता 128GB स्टोरेजची किंमत 1500 रुपयांनी कमी केली आहे, जी आता 17,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. त्याबरोबरच, 256GB व्हेरिएंटची किंमत 3000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यासह हा व्हेरिएंट तुम्ही 19,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A15 5G Camera
Samsung Galaxy A15 5G Camera

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A15 5G फोनमध्ये 6.5 इंच FHD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सेल आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. MediaTek Dimensity 6100+ विशेषतः गेमिंगमध्ये तुम्हाला सर्वोत्तम परफॉर्मन्स देतो. CPU आणि GPU चे पॉवरफुल संयोजन स्मूथ आणि इमर्सिव गेमिंग कार्यप्रदर्शन सुनिश्चित करते, ज्यामुळे तुमचे गेमिंग सेशन अधिक आनंददायी बनते.

Samsung Galaxy A15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. या व्यतिरिक्त, यामध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo