आता रिलायन्स जिओच्या प्रीव्ह्यू ऑफरसाठी आसूस TCL आणि अल्काटेलच्या सर्व फोन्सवरही मिळेल.जर आपल्याजवळ हे फोन्स असतील, तर आपल्याला रिलायन्स जिओची ह्या ऑफरचा लाभ घेता येईल.
रिलायन्स जिओच्या प्रीव्ह्यू ऑफर अंतर्गत यूजर्सला ९० दिवसांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त ऑफर मिळेल आणि ही ऑफर आणखी काही फोन्सवर देखील मिळणार आहे, आता आपण सॅमसंग, LG, पॅनेसोनिक, LYF, मायक्रोमॅक्स आणि YU च्या फोन्ससह आता आसूस, TCL आणि Alcatel च्या फोन्सवरही ही ऑफर मिळणार आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
रिलायन्सने सांगितले आहे की, ही ऑफर एकूण ९ कंपन्यांच्या फोन्सवर चालेल.
जर आधीच्या स्मार्टफोन्सविषयी बोलायचे झाले तर, ही ऑफर YU आणि मायक्रोमॅक्स स्मार्टफोन्सवर उपलब्ध झाली आहे. त्याआधी ही ऑफर सॅमसंग, LG, LYF, पॅनेसोनिक सह आसूस Yu आणि मायक्रोमॅक्सवरही आली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ह्या सर्व स्मार्टफोन्सवर आपण रिलायन्स प्रीव्ह्यू ऑफरचा लाभ पुर्ण ९० दिवसांची घेणार आहोत.
ही ऑफर YU च्या जवळपास सर्व फोन्सवर सुरु झाली आहे. मात्र मायक्रोमॅक्सच्या काही निवडक फोन्सवरच ह्या सेवेचा लाभ घेऊ शकता.