Redmi Note 7 लॉन्च च्या आधी फ्लिपकार्ट वर झाला टीज

Updated on 22-Feb-2019
HIGHLIGHTS

28 फेब्रुवारीला Xiaomi भारतात आपला Redmi Note 7 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि आता फ्लिपकार्ट वर पण डिवाइस साठी एक डेडिकेटेड पेज तयार करण्यात आले आहे ज्यावर डिवाइस चे काही खास फीचर्स दाखवण्यात आले आहेत.

Xiaomi 28 फेब्रुवारीला भारतात आपला Redmi Note 7 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याबद्दल कंपनी ने अधिकृत घोषणा पण केली आहे. स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात याची उत्सुकतेने वाट बघितली जात आहे. आता फोनच्या अधिकृत लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर “नोटिफाई मी” चे डेडिकेटेड पेज लाइव झाले आहे. नोटिफाई मी बटणा व्यतिरिक्त या पेज वर डिवाइसच्या काही खास फीचर्सची पण माहिती मिळते. या फीचर्स मध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 SoC, डिजाइन, स्प्लॅश रेजिस्टेंस आणि चांगल्या बॅटरी लाइफ चा समावेश आहे. जरी टीजर मधून जास्त माहिती मिळाली नसली तरी आम्हाला आधीच डिवाइस बद्दल सर्व काही माहीत आहे कारण Redmi Note 7 आधीच चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. 

Redmi Note 7 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 7 पहिला रेडमी फोन आहे जो ग्लास बॅक, वॉटरड्रॉप नॉच आणि फ्रंट व रियर पॅनल वर 2.5D ग्लास देण्यात आली आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.3 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340×1080 पिक्सलच्या फुल HD+ रेजोल्यूशन सह येतो आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 SoC द्वारा संचालित आहे जो ओक्टा कोर प्रोसेसर आहे आणि हा 14nm प्रोसेस वर Kryo 260 कोर्स सह बनवण्यात आला आहे आणि डिवाइस मध्ये एड्रेनो 512 GPU आहे. 

कॅमेर्‍या बद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 7 पहिला असा बजेट डिवाइस आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइसच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा सॅमसंग GM1 इमेज सेंसर देण्यात आला आहे आणि या सेंसर सोबत एक 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण आहे. रेडमी नोट 7 च्या फ्रंटला 13 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा आहे. Redmi Note 7 मध्ये देण्यात आलेला कॅमेरा सेटअप AI फीचर्स सह येतो ज्यात सीन रेकोग्निशन, AI पोर्ट्रेट मोड आणि AI ब्यूटी मोड पण आहे. 

रेड्मी नोट 7 मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हा ब्लू, गोल्ड, ट्वीलाइट ब्लॅक रंगांच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कनेक्टिविटी बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, IR ब्लास्टर, एक USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे. 

Redmi Note 7 ची किंमत

Redmi Note 7 चा 3GB रॅम वेरिएंट चीन मध्ये RMB 999 (जवळपास Rs 10,400) आणि 4GB रॅम वेरिएंट RMB 1,199 (जवळपास Rs 12,500) मध्ये उपलब्ध आहे आणि आशा आहे की भारतात हा फोन याच किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. 
 

 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :