Redmi Note 12 Turbo ‘Harry Potter’ एडिशन लवकरच होणार दाखल, बघा विशेषता

Redmi Note 12 Turbo ‘Harry Potter’ एडिशन लवकरच होणार दाखल, बघा विशेषता
HIGHLIGHTS

Redmi Note 12 Turbo फोनची हॅरी पॉटर थीम एडिशन आणणार आहे.

Redmi Note 12 Turbo Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करेल.

Redmi Note 12 Turbo मध्ये 64 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळेल.

टेक कंपन्यांनी अनेकदा त्यांच्या प्रोडक्ट्सचे स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी  हॉलीवूड स्टुडिओशी हातमिळवणी केली आहे. ग्राहक त्यांच्या आवडत्या चित्रपटांशी संबंधित प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. ताज्या अहवालानुसार, Redmi आपल्या Redmi Note 12 Turbo फोनची 'Harry Potter' थीम असलेली आवृत्ती आणण्याच्या तयारीत आहे.

Redmi Note 12 Turbo 

नवीनतम अहवाल आणि टीझर्सनुसार, फोन 12-बिट फ्लेक्सिबल OLED पॅनेल, 16GB + 1TB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह 67W जलद चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीने डिवाइसचा आइस फॅडर व्हाईट कलर देखील टीज केला आहे. फोनला Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर मिळेल, जो LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह जोडला जाईल. 

फोनला 3725mm व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम मिळेल, ज्यामुळे उष्णतेचा अपव्यय 35% ने सुधारेल. Redmi Note 12 Turbo Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करेल.

Redmi Note 12 Turbo ला 64-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळेल. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि Xiaomi इमेजिंग इंजिन 2.0 डिव्हाइसमध्ये उपलब्ध असेल. आत्तापर्यंत, डिव्हाइसमधील सहायक कॅमेराबद्दल कोणतीही माहिती नाही. Redmi Note 12 Turbo भारतात 5 एप्रिल रोजी Poco F5 ब्रँडिंग अंतर्गत सादर केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo