Amazon प्राइम डे सेल संपला असेल तरीही ई-कॉमर्स कंपनी अजूनही काही स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत देत आहे. खरं तर, Redmi Note 12 5G भारी डिस्काउंटसह साईटवर उपलब्ध आहे. Amazon या स्मार्टफोनवर अप्रतिम एक्सचेंज ऑफरसह फ्लॅट 3000 रुपयांची सूट देत आहे.
Redmi Note 12 5G च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. परंतु Amazon द्वारे ऑफर केलेल्या 14% सवलतीनंतर सध्या फोन 18,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. याशिवाय, यावर एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील मिळतील. येथून खरेदी करा
बँक ऑफरमध्ये तुम्ही HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1000 रुपयांच्या किमान खरेदीवर 250 रुपयांपर्यंत 5% सूट मिळवू शकता. एक्सचेंज ऑफर अंतर्गत Redmi Note 12 5G वर 18,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत केली जाऊ शकते.
मुख्य तपशील
Redmi Note 12 5G मध्ये सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1200 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. हा फोन Snapdragon 4 Gen 1 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळतोय.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile