15 हजारांच्या आत येणाऱ्या Redmi Note 11SE ची पहिली विक्री आज , ‘अशा’प्रकारे फक्त 599 रुपयांना खरेदी करा

15 हजारांच्या आत येणाऱ्या Redmi Note 11SE ची पहिली विक्री आज , ‘अशा’प्रकारे फक्त 599 रुपयांना खरेदी करा
HIGHLIGHTS

Redmi Note 11SE ची पहिली विक्री आज

Flipkart आणि mi च्या अधिकृत वेबसाइटवरून Note 11 SE खरेदीसाठी उपलब्ध

स्मार्टफोन MediaTek Helio G95 चिपसेटद्वारे समर्थित आहे.

Redmi आज 31 ऑगस्ट रोजी भारतात प्रथमच आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE लाँच करणार आहे. तुम्ही आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि mi च्या अधिकृत वेबसाइटवरून Note 11 SE खरेदी करू शकता. Redmi Note 11SE ची विशेषता म्हणजे यात तुम्हाला 64MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G95 चिपसेट आणि 5,000 mAh बॅटरी मिळेल. जाणून घेऊयात फोनची किंमत, लॉन्च ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन संबंधित सर्व तपशील… 

हे सुद्धा वाचा : Xiaomi NoteBook Pro 120 सिरीज : 120Hz स्क्रीनसह पावरफुल प्रोसेसर, जाणून घ्या किंमत 

Redmi Note 11SE किंमत आणि सेल ऑफर्स 

Redmi Note 11SE च्या 6GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हा फोन Biforst Blue, Cosmic White, Space Black आणि Thunder Purple चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने फोनवर तुम्हाला 1000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. SBI च्या मास्टर डेबिट कार्डवर 10% पर्यंत त्वरित सूट देखील आहे.

त्याबरोबरच, तुम्ही हा फोन तुमच्या जुन्या फोनसोबत एक्सचेंज करून खरेदी केल्यास तुम्हाला 13,400 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्हाला संपूर्ण एक्स्चेंज डिस्काउंट मिळत असेल तर तुम्ही ते फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Note 11 SE ₹ 468 च्या EMI वर देखील खरेदी करता येईल.

Redmi Note 11SE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11SE मध्ये ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह 6.43-इंच लांबीचा सुपर AMOLED डॉट डिस्प्ले असेल. त्याचा डिस्प्ले 2400 x 1080 FHD + रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. Redmi च्या या बजेट गेमिंग फोनमध्ये 1100 nits पर्यंत पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक फीचरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G95 चिपसेटद्वारे समर्थित आहे.

स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 64MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 11SE मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 0-54 टक्के चार्ज होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo