Best offer: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi A3 ची पहिली सेल आज होणार सुरु, आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 

Best offer: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi A3 ची पहिली सेल आज होणार सुरु, आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Redmi A3 कंपनीचा नवा बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची विक्री आजपासून सुरु होईल.

Redmi A3 ची विक्री Amazon आणि Flipkart वर आज दुपारी 12 वाजता सुरू होईल.

या हँडसेटमध्ये Mediatek Helio G36 Octa Core प्रोसेसर आहे.

Redmi ने आपल्या नवा बजेट स्मार्टफोन Redmi A3 या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच केला. त्यानंतर या स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 23 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान हा स्मार्टफोन उत्कृष्ट एक्सचेंज ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, हा फोन Amazon आणि Flipkart या लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Redmi A3 ची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Airtel New Plans: टेलिकॉम दिग्गजने लाँच केले जबरदस्त प्लॅन्स, आकाशातही मिळणार हाय-स्पीड इंटरनेट। Tech News

Redmi A3 ची किंमत आणि ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Redmi A3 ची विक्री Amazon आणि Flipkart वर आज दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन अनेक प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा 3GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. तर, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह व्हेरिएंट 8,299 रुपयांमध्ये येतो.

याव्यतिरिक्त, फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,299 रुपये आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये फोन 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi A3
Redmi A3

Redmi A3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या Redmi फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग दर 180Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये Mediatek Helio G36 Octa Core प्रोसेसर आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM सोबत 6GB व्हर्चुअल रॅम ऑप्शन देखील दिले आहे. एवढेच नाही तर, फोनमधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड सुविधा देखील उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 8MP मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 5MP फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, 10W चा चार्जर आणि USB Type-C पोर्ट मिळेल. सिक्योरिटीकरता फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo