Realme P3x 5G ची भारतीय लाँच तारीख जाहीर! अप्रतिम कॅमेरासह आणखी काय मिळेल विशेष? 

HIGHLIGHTS

Realme ने Realme P3x 5G ची लाँचिंग तारीख जाहीर केली.

अलीकडेच Realme ने Realme P3 Pro 5G ची लाँच तारीख जाहीर केली होती.

Realme P3x 5G मायक्रो वेबसाइट लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे.

Realme P3x 5G ची भारतीय लाँच तारीख जाहीर! अप्रतिम कॅमेरासह आणखी काय मिळेल विशेष? 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच Realme P3 Pro 5G ची लाँच तारीख जाहीर केली होती. दरम्यान, कंपनीने आपल्या आणखी एका नव्या स्मार्टफोनची म्हणजेच Realme P3x 5G ची लाँचिंग तारीख जाहीर केली आहे. होय, कंपनीने आता त्यांच्या आणखी एका आगामी स्मार्टफोनच्या लाँचची पुष्टी केली आहे. Realme P3x 5G मायक्रो वेबसाइट लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme P3x 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: व्हॅलेंटाईन्स डे सेलमध्ये Realme GT 6T वर तब्बल 7,500 रुपयांची सूट, 50MP कॅमेरासह मिळतात भारी फीचर्स

Realme P3x 5G चे भारतीय लाँच

आम्ही तुम्हाला सांगतो की, 18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता Realme P3x 5G स्मार्टफोन देखील Realme P3 Pro 5G सोबत लाँच केला जाणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X हॅन्डलवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. फ्लिपकार्टवरील स्मार्टफोनच्या पेज लाईव्हनुसार रियलमी हा फोन लूनर सिल्व्हर, स्टेलर पिंक आणि मिडनाईट ब्लू कलर ऑप्शन्ससह सांद्र करणार आहे. एवढेच नाही तर, या फोनच्या मायक्रोसाईटद्वारे फोनचे अनेक फीचर्स देखील पुढे आले आहेत.

Realme P3x 5G चे अपेक्षित तपशील-

Realme P3x 5G फोनचे अनेक स्पेक्स Flipkart मायक्रो साईटद्वारे पुढे आले आहेत. मायक्रो वेबसाइटवरून देखील पुष्टी झाली आहे की हा फोन अल्ट्रा स्लिम असेल. त्याची जाडी 7.49 मिमी असेल. ते प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइनसह आणले जाईल. पोस्टरनुसार फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. हे उपकरण राउंड कॅमेरा मॉड्यूलसह ​​येईल. हा फोन या सेगमेंटचा पहिला स्मार्टफोन असेल, त्यासह ग्लो इन द डार्क डिझाईन असेल. अर्थातच, नावावरूनच समजले असेल की, हा फोन Realme P3 Pro 5G प्रमाणेच अंधारातही चमकेल.

Realme ने Realme P3x 5G ची लाँचिंग तारीख जाहीर केली.

तर, लीकनुसार पुढे आलेल्या तपशिलांनुसार, Realme P3x 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो. तर, यासह कंपनी टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम + 256GB स्टोरेज देऊ शकते. मात्र, फोनचे कन्फर्म स्पेक्स हा फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo