Realme P1 5G सिरीजची आज भारतात पहिली सेल, बेस्ट ऑफर्ससह Affordable स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 

 Realme P1 5G सिरीजची आज भारतात पहिली सेल, बेस्ट ऑफर्ससह Affordable स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Realme P1 5G सिरीजची पहिली सेल आज 22 एप्रिल रोजी Flipkart वर सुरु होणार

या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची बँक सूट आणि स्वस्त EMI मिळेल.

Realme P1 Pro 5G संध्याकाळी 6 वाजल्यापासून खरेदी करता येईल.

Realme ची नवीन पॉवर सिरीज नुकतेच भारतात सादर करण्यात आली आहे. त्यानंतर, Realme P1 सिरीजची पहिली सेल आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरु होणार आहे. होय आज दुपारी 12 वाजल्यापासून या Realme P1 5G ची विक्री सुरू होईल, तर Realme P1 Pro 5G संध्याकाळी 6 वाजल्यापासून खरेदी करता येईल. दोन्ही स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात सिरीजमधील स्मार्टफोन्सची किंमत आणि ऑफर्स-

Realme P1 5G सिरीजची किंमत

Realme P1 च्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, त्याचे 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, त्याच्या टॉप मॉडेलच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत म्हणजेच Realme P1 Pro 5G ची किंमत 19,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या सिरीजच्या पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची बँक सूट आणि स्वस्त EMI मिळेल. या व्यतिरिक्त या स्मार्टफोन्सवर मजबूत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.

Realme P1 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P1 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आली आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये पहिला 50MP AI लेन्स आणि दुसरा 2MP पोर्ट्रेट सेन्सर आहे. त्याबरोबरच, 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 45W फास्ट चार्जिंगसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme P1 5G
Realme P1 5G

Realme P1 Pro 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P1 Pro मध्ये 6.67 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm चे Snapdragon 6 Gen 1 चिप आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी यात 45W SUPERVOOC चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo