Realme NARZO Week Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme NARZO वीक सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर लाइव्ह झाली आहे. ही सेल गुरुवारी 20 जूनपासून सुरू झाली आहे, जी 25 जूनपर्यंत LIVE राहील. सेल दरम्यान तुम्ही बंपर डील आणि डिस्काउंट ऑफरसह Realme स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. या फोनवर विशेष डिस्काउंट कूपनसह बँक कार्ड सवलत उपलब्ध आहेत. सेलदरम्यान तुम्ही लेटेस्ट Realme स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करू शकता.
Realme Narzo N63 स्मार्टफोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज प्रकार 8,498 रुपयांना Amazon सेलदरम्यान खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 500 रुपयांचे डिस्काउंट कूपनही दिले जात आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे तुम्हाला फोनवर 1,250 रुपयांची वेगळी सूट मिळणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी Realme फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तर, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. येथून खरेदी करा
#Narzo N65
Realme Narzo N65 5G
Realme Narzo N65 5G स्मार्टफोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 12,498 रुपयांना सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. बँक कार्डद्वारे फोनवर 1,250 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह मिळेल. येथून खरेदी करा
Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 21,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर 3000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. दुसरीकडे, बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची वेगळी सूट आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासह 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile