50MP कॅमेरासह Realme Narzo N65 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

50MP कॅमेरासह Realme Narzo N65 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo N65 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

Realme Narzo N65 5G ची सुरुवातीची किंमत 11,499 रुपये आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme Narzo N65 5G: अलीकडेच Realme ने Realme Narzo N65 5G स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo N65 5G दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज सारखे अनेक दमदार फीचर्स आहेत. Realme Narzo N65 5G बजेट रेंज सेगमेंटमध्ये आणला गेला आहे. कंपनी कमी किमतीत दमदार फीचर्स देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, नव्या स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

Also Read: JioCinema New Plan: कंपनीने लाँच केला नवा Affordable प्लॅन, वार्षिक वैधतेसह घेता येईल OTT मजा

दरम्यान, तुमच्या माहितीसाठी सांगतो की कंपनी Realme Narzo N65 5G उद्या म्हणजेच 28 मे 2024 रोजी फोन लाँच करणार होती. मात्र, हे भारतीय बाजारपेठेत एक दिवस आधी म्हणजेच आज 27 मे 2024 रोजी लाँच करण्यात आले आहे.

Realme Narzo N65 5G ची भारतीय किंमत

Realme Narzo N65 5G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याची किंमत 11,499 रुपये आहे. तर, नव्या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये हा फोन 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर, टॉप व्हेरिएंट 1000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह 11,499 रुपयांना उपलब्ध असेल.

Realme Narzo N65 5G
Realme Narzo N65 5G

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री Realme.com आणि Amazon.in वर 31 मे 2024 रोजी दुपारपासून सुरू होईल. कंपनीच्या मार्जो सीरीजचा हा नवीन फोन Amber Gold आणि Deep Green या दोन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

Realme Narzo N65 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo च्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. त्याबरोबरच, फोनला सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कट मिळत आहे. तर, चांगल्या परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसर आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी Realme Narzo N65 5G IP54 रेटिंग देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme Narzo N सीरीजच्या या नवीन फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W क्विक चार्जिंगला सपोर्ट करते. यासह वेब सर्फिंगसारखी बेसिक कार्ये करताना बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo