त्वरा करा ! Realme Narzo N53 ची रेगुलर सेल सुरु, बंपर ऑफरसह खरेदी करा नवा फोन

त्वरा करा ! Realme Narzo N53 ची रेगुलर सेल सुरु, बंपर ऑफरसह खरेदी करा नवा फोन
HIGHLIGHTS

Realme Narzo N53 ची नियमित सेल सुरु

4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये

HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड खरेदीसह 1000 रुपयांपर्यंतची सूट

Realme ने अलीकडेच त्यांच्या नवीन लाँच झालेल्या Realme Narzo N53 स्मार्टफोनची स्पेशल सेल आयोजित केली होती. त्यानंतर आज म्हणजेच 24 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून या स्मार्टफोनची नियमित सेल सुरू करण्यात आली आहे. हा फोन अधिकृत वेबसाइट तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Realme Narzo N53 ची किमंत 

फोनच्या 4GB Ram + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर, Realme Narzo N53 चे 6GB + 128GB मॉडेल 10,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

ऑफर्स : HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड खरेदीसह 1000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तर, फोनवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरची सुविधा देखील दिली जात आहे. खरेदीसाठी आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Realme Narzo N53

कंपनीने Narzo N53 स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच लांबीचा फुल HD प्लस LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये Unisoc T612 4G प्रोसेसर आहे आणि हा मोबाइल नवीनतम Android 13 वर कार्य करतो. हा मोबाईल फोन फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरने सुसज्ज आहे.

Narjo N53 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 50MP प्रायमरी लेन्स आणि दुसरा AI सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh जंबो बॅटरी उपलब्ध आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo