Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x ची पहिली सेल आज, जाणून घ्या Best ऑफर्स
Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x हे नवीन स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच
नवे स्मार्टफोन आज दुपारी Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला फोनवर सवलतींपासून ते स्वस्त EMI पर्यंत सर्व ऑफर्स मिळतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x हे नवीन स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच केले आहेत. त्यानंतर, या दोन्ही उपकरणांची विक्री आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर लाईव्ह होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला मोबाईल फोनवर सवलतींपासून ते स्वस्त EMI पर्यंत सर्व ऑफर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x ची किंमत आणि ऑफर्स-
Survey
Also Read: Oppo K13 5G फोनची भारतीय लाँच तारीख निश्चित! मिळेल तब्बल 7000mAh बॅटरी
Realme Narzo 80 Pro, Realme Narzo 80x ची किंमत आणि ऑफर्स
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 80x च्या 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या फोनच्या 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. त्याबरोबरच, Realme Narzo 80 Pro च्या 8GB+128GB आणि 8GB+256GB स्टोरेज मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 19,999 आणि 21,499 रुपये आहे. अखेर फोनच्या 12GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 23,499 रुपये इतकी आहे.
फोनमधील पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 80 Pro, Realme Narzo 80x स्मार्टफोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याबरोबरच, परवडणाऱ्या दरात EMI उपलब्ध असेल. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असेल.
Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x
डिस्प्ले
Realme Narzo 80 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 4500 nits आणि हा फोन अँड्रॉइड 15 वर कार्य करतो. दुसरीकडे, Realme Narzo 80X मध्ये 6.72-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

प्रोसेसर
Realme Narzo 80 Pro फोनमध्ये चांगल्या कार्यासाठी, मोबाईल फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर देण्यात आला आहे. दुसरीकडे, Realme Narzo 80x फोन सुरळीत कामकाजासाठी Dimensity 6400 5G चिपसेटसह सुसज्ज आहे.
कॅमेरा
Realme Narzo 80 Pro फोनमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, Realme Narzo 80x फोनमध्ये देखील फोटोग्राफीसाठी या डिव्हाइसमध्ये 50MP कॅमेरा मिळणार आहे.
बॅटरी
Realme Narzo 80 Pro मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याबरोबरच, Realme Narzo 80x हँडसेटमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile