नवा Realme Narzo 70x फोन 45W फास्ट चार्जिंगसह होणार लाँच, ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल। Tech News 

नवा Realme Narzo 70x फोन 45W फास्ट चार्जिंगसह होणार लाँच, ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo 70x ची भारतीय लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे.

Realme Narzo 70x फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे

या फोनची किंमत भारतात 12000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Realme चा नवीनतम Realme Narzo 70 Pro स्मार्टफोन गेल्या महिन्यातच भारतात लॉन्च झाला होता. त्यानंतर, या सिरीजचा विस्तार करत कंपनीने सिरींजमधील नवीन फोनच्या भारतीय लॉन्चिंगची पुष्टी केली आहे. आगामी स्मार्टफोनचे नाव Realme Narzo 70x असे आहे. एवढेच नाही तर, कंपनीने फोनच्या लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. यासह, फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Realme इंडियाच्या साइटवर थेट झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme Narzo 70x चे भारतीय लॉन्चिंग तपशील-

हे सुद्धा वाचा: Infinix Note 40 Pro 5G सिरीजची Sale आजपासून होणार सुरु, पहिल्या विक्रीत Best ऑफर्ससह खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन

Realme Narzo 70x चे लॉन्चिंग डिटेल्स

Realme Narzo 70x 5G : India launch date, price range & more officially announced

Realme India साइटवर Realme Narzo 70x ची लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे. हा फोन भारतात 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे. या साईटच्या माध्यमातून फोनचे अनेक फीचर्स ऑनलाइन समोर आले आहेत. Realme Narzo 70X फोन ब्लु कलर ऑप्शन्ससह दाखल होईल. रंगाच्या पर्यायात नॉक करेल. हा फोन इतर कलर ऑप्शन्ससह देखील सादर केला जाऊ शकतो, ज्याची माहिती लॉन्च दरम्यान मिळेल.

Realme Narzo 70x चे कन्फर्म तपशील

साईटच्या माध्यमातून फोनची पहिली झलक समोर आली आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या मागील बाजूस Realme Narzo 70 Pro सारखा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. एवढेचं नाही तर, किंमत श्रेणीचा तपशील देखील उघड करण्यात आला आहे. Realme Narzo 70x फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असेल. यासोबत फोनला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची किंमत भारतात 12000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल, असे बोलले जात आहे.

Realme Narzo 70 Pro

Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G

Realme Narzo 70 Pro फोनमध्ये 6.67 इंच फुल-HD+ डिस्प्ले आहे. सुरळीत कामकाजासाठी हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन गेल्या महिन्यात 18,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo