Realme on data stealing: Realme भारतीय युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचे म्हणजेच हेरगिरी करत असल्याचे कंपनीवर आरोप आहे. कंपनीने Enhanced intelligence Services ही सुविधा लागू केली आहे आणि याद्वारे वापरकर्त्यांचा डेटा चोरी केला जात आहे, असा आरोप कंपनीवर केला गेला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Realme ने दिले स्पष्टीकरण
मात्र, स्मार्टफोन निर्मात्याने सोमवारी यावर स्पष्टीकरण दिले आहे. "एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस फीचर SMS, फोन कॉल आणि कॅलेंडर डेटावर डेटा गोळा करत नाही. कंपनीने असेही म्हटले आहे की, डेटा वापरकर्त्यांच्या डिवाइसवर एन्क्रिप्टेड केला जातो. कंपनी स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करते.", असे कंपनीने सांगितले.
तसेच, जर तुम्हाला या फिचरचा भाग म्हणून दिलेल्या काही परवानग्या रद्द करायच्या असतील. तर तुम्ही ते सेटिंग्ज > ऍप > ऍप मॅनेजमेंट > इंटेलिजेंट सर्व्हिसेस > परमिशन. या प्रक्रियेद्वारे सहज नियंत्रित करू शकता.
एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस फीचर डिसेबल करण्याची प्रक्रिया
आणि जर तुम्हाला हे फिचर डिसेबल करायचे असेल तर, सेटिंग्ज वर जा. त्यांनतर अतिरिक्त सेटिंग्ज वर क्लिक करा. आता सिस्टम सर्व्हिसेस सिलेक्ट करा. त्यानंतर, एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस अनचेक करा. आता तुमचा फोन रीस्टार्ट करा. अशाप्रकारे या प्रक्रियेद्वारे ही सेवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिसेबल केली जाईल.
महत्त्वाचे : मात्र एक लक्षात घ्या की, तुम्ही एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये डिसेबल केल्यास काही ऍप्स आणि सर्व्हिसेस अनुपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile