Realme कडून 15 ऑगस्टपर्यंत जोरदार ऑफर, 5G स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट

Realme कडून 15 ऑगस्टपर्यंत जोरदार ऑफर, 5G स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट
HIGHLIGHTS

Realme 8s 5G वर जबरदस्त ऑफर

स्मार्टफोन तीन हजार रुपयांचा सवलतीसह खरेदी करा

ऑफरची अंतिम तारीख 15 ऑगस्ट

जर तुम्ही कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realime ची खास ऑफर फक्त तुमच्यासाठी आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह आहेत. तुम्ही Realme 8s 5G स्मार्टफोन 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची झटपट सूटही मिळेल. या दोन्ही ऑफरसह, हा फोन 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह तुमचा असू शकतो. 

हे सुद्धा वाचा : महत्त्वाची बातमी ! iPhone 14 Pro मॉडेलची किंमत गेल्या वर्षीच्या iPhone पेक्षा 15 % जास्त असण्याची शक्यता

या ऑफरची अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे. Realme 8s 5G स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. ज्याची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे.

Realme 8s 5G 

फोनमध्ये कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच फुल HD + डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश रेट आणि 600 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. यामध्ये कंपनी 5 GB व्हर्च्युअल रॅम देखील देत आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Dimensity 810 5G चिपसेट आहे.

realme 8s 5g

फोनमध्ये तुम्हाला LED फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल. याशिवाय येथे ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट लेन्स आणि मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा देत आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

याव्यतिरिक्त, हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo